उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इतिहास रचला. त्यांनी सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. योगींच्या मंत्रिमंडळात एकूण ५३ मंत्री आहेत. यात जुन्या मंत्रिमंडळातील अनेक प्रमुख चेहऱ्यांसह नव्या चेहऱ्यांनाही यावेळी स्थान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत पराभूत होऊनही केशवप्रसाद मौर्य यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. तर ब्रजेश पाठक यांनाही ब्राह्मण चेहरा म्हणून उपमुख्यमंत्रीपद मिळाले आहे.
(हेही वाचा ईडी आहे की घरगडी? मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला)
केंद्र असो की राज्य, मंत्रिमंडळात जास्तीत जास्त मंत्र्यांची संख्या मर्यादित असते. भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या १५ टक्के असू शकते. त्याचप्रमाणे राज्याच्या बाबतीतही विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १५ टक्के इतकेच मंत्री करता येतात.