मालाड आणि मालवणी आगारात बेस्ट समितीचे सदस्य सुनील गुलाबराव गणाचार्य यांनी मंगळवारी दूपारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील समस्या जाणून घेत कामगारांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
( हेही वाचा : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालय संतापले! )
आगार अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडवण्यास सांगितले
गणाचार्य यांनी कामगारांशी बोलून वाहतूक विभागातील कामगारांच्या समस्यांबाबत आगार अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी बस चालकाना दिले जाणारे बस वाहकाचे काम तसेच कस्तुरबा व साईनाथ चौकीवर पाणी पिण्याची व्यवस्था करण्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मालाड आगारात कँटीनमध्ये जेवणाची व्यवस्था, साफसफाई नाही त्या बद्दलही विचारणा केली. कस्तुरबा टर्मिनस, साईनाथ टर्मिनस, भाईंदर टर्मिनसवर असलेल्या बस पार्किंगच्या गैरसोयीबाबत सुनील गणाचार्य यांनी आगार अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या सोडवण्यास सांगितले.