Drug Cartel Encounter : पळून जाण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांच्या गोळीबारात ड्रग्ज माफिया जखमी

14
Drug Cartel Encounter : पळून जाण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांच्या गोळीबारात ड्रग्ज माफिया जखमी

Drug Cartel Encounter           ड्रग्ज माफियांविरोधात केलेल्या धडक कारवाईदरम्यान शिवसागर पोलिसांच्या गोळीबारात आरोपी रुबुल खान जखमी झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, रुबुल खानच्या उजव्या पायाला गोळी लागली आहे. त्याला उपचारासाठी शिवसागर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Drug Cartel Encounter)

मिळालेल्या माहितीनुसार, रुबुल खान हा ड्रग्ज व्यावसायिक विकी सिंगचा साथीदार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या १८ सप्टेंबर रोजी विमान बरुआ नावाच्या व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याप्रकरणी विकी सिंगवर आरोप आहे. पोलिसांच्या मते, या हत्येच्या वेळी रुबुल खानदेखील त्याच्यासोबत उपस्थित होता. (Drug Cartel Encounter)

(हेही वाचा – Today Horoscope 22 September 2026 : श्रीगणेशाच्या कृपेने आजचा दिवस कसा जाणार? तुमच्या राशीसाठी काय संकेत?)

यापूर्वी १९ सप्टेंबर रोजी बिहुबर पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान विकी सिंग हादेखील गोळी लागल्याने जखमी झाला होता. पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याने पोलिसांना ढकलून पळ काढण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडली होती. (Drug Cartel Encounter)

ड्रग्ज तस्करीविरोधात कडक कारवाईच्या मागणीसाठी बिहुबर भागातील स्थानिक नागरिकांनी तीव्र निदर्शनेही केली होती. दरम्यान, मंगळवारी पहाटे पोलिस कोठडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करताना रुबुल खान पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला. घटनेनंतर त्याला तात्काळ शिवसागर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Drug Cartel Encounter)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.