Hindu Rashtra : एकाच ध्येयाचे दोन समांतर रूळ

16
Hindu Rashtra
Hindu Rashtra
  • दादासाहेब दापोलीकर

Hindu Rashtra : हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी, कोणतीतरी समर्थ आणि सुसंघटित संघटना असावी असे डॉक्टर हेडगेवारांना नेहमी वाटायचे. राष्ट्रोन्नती, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रविमोचनाच्या तळमळीतूनच पुढे डॉक्टर हेडगेवार यांनी १९२५च्या विजयादशमीच्या दिवशी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ ही संघटना स्थापन केली. हिंदुंचे ऐक्य, हिंदू राष्ट्राची संकल्पना अशा विस्तृत विचारधारेने आणि अनेकविध हेतूंनी ही संघटना डॉक्टरांनी स्थापन केली. श्री संत पाचलेगावकर महाराज यांची त्यावेळी हिंदू धर्मासाठी कार्य करणारी ‘मुक्तेश्वर दल’ नावाची एक संघटना होती. ती संघटना त्यांनी त्यांच्या अनुयायांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये विलीन केली.

ही झाली या दोन संघटनांच्या स्थापनेची कहाणी. हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन संस्थांमधील प्रमुख फरक म्हणजे हिंदू महासभा हा मुख्यत्वेकरून एक राजकीय पक्ष आहे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. दोन्ही संघटनांच्या विचारधारा जवळजवळ सारख्याच आहेत. त्यांची उद्दिष्टेही जवळजवळ सारखीच आहेत. हिंदू महासभा ज्यावेळी सामर्थ्यवान होती, त्यावेळी अनेक लोक एकाचवेळी हिंदू महासभेचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही सदस्य असायचे. स्वतः डॉक्टर हेडगेवार तर शेवटपर्यंत हिंदू महासभेचे सदस्य होते. या दोन्ही संघटनांमधील मंडळी ही एकाच ध्येयाने, राष्ट्रप्रेमाने, राष्ट्रहिताने प्रेरित झालेली असल्यामुळे आणि बहुतांश नेते मंडळी ही उच्च कोटीची सम्यक, सर्वसमावेशक आणि विवेकशील असल्यामुळे त्यांच्यामध्ये कधी मतभेद झाल्याचे ऐकिवात नाही. परस्परांना समांतर असणारे रूळ जसे एकाच स्थानाकडे जाणाऱ्या आगगाडीला वाटचाल करण्यासाठी मदत करीत असतात, तसंच काहीसं या संघटनांबाबत म्हणता येईल. दोन्ही रूळ, त्या रुळांवरून चालणाऱ्या आगगाडीच्या चाकांच्या आणि डब्यांच्या माध्यमातून परस्परांशी अप्रत्यक्षरीत्या जसे जोडले गेलेले असतात, त्याचप्रमाणे या संघटना, त्यांची नेते मंडळी आणि सदस्य यांच्याद्वारे अप्रत्यक्षरीत्या जोडल्या गेल्या होत्या. आगगाडीप्रमाणे ही नेते मंडळी पण एकाच ध्येयाकडे वाटचाल करीत होती! याची काही उदाहरणे पाहूया.

(हेही वाचा – Apple Foldable iPhone : भारतीयांमध्ये फोल्डिंग आयफोनची एवढी क्रेझ का? रेग्युलर आयफोनपेक्षा काय आहे खास? )

डॉक्टर बाबाराव सावरकर त्यावेळी ‘तरुण हिंदुसभा’ नावाची हिंदू तरुणांची एक संघटना चालवायचे. तीन सावरकर बंधूंपैकी सर्वात धाकटे- डॉक्टर नारायणराव सावरकर यांच्या पत्नीचे मामा विश्वनाथ केळकर हे डॉक्टर हेडगेवार यांचे जवळचे मित्र होते. या संबंधांमधून बाबाराव सावरकर आणि डॉक्टर हेडगेवार एकत्र आले आणि परस्परांना हिंदू हित आणि हिंदू संघटनांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. ही गोष्ट साधारण १९२३च्या आसपास. त्यामुळे तरुण हिंदुसभेची नागपूर शाखा सुरू करण्याचा संकल्प जेव्हा पुढे आला, तेव्हा बाबांच्या समोर साहजिक डॉक्टर हेडगेवार यांचे नाव आले. डॉक्टर हेडगेवार हे मध्य प्रांताच्या काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सदस्य असल्याने १९२८च्या शेवटी झालेल्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनालाही उपस्थित होते. यावेळी क्रांतिकारक बाबाराव सावरकरही त्यांच्या समवेत होते. या भेटीने परस्परांचा जवळून परिचय झाला व दोघांच्याही विचारातील साधर्म्य अधिक ध्यानात आले. यावेळी जडलेल्या स्नेह शेवटपर्यंत अतूट होता हे सांगावयास नकोच.

त्याच वर्षी हिंदू महासभेच्या कार्यकारिणीची बैठक भरणार होती. त्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर हेडगेवार यांना आमंत्रित केले गेले होते. दुर्दैवाने प्रकृती अस्वास्थ्यामुळे डॉक्टर त्या बैठकीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. डॉक्टर हेडगेवार हे शेवटपर्यंत नागपूरच्या हिंदू महासभेचे उपाध्यक्ष होते. स्वातंत्र्यवीरांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर यांनी जेव्हा ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक सुरू केले, तेव्हा नागपूरमध्ये त्यासाठी वर्गणी गोळा करण्याचे कार्य डॉक्टर हेडगेवार यांनी स्वतः केले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.