-
प्रतिनिधी
IIT Bombay आयआयटी मुंबईच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी सायंकाळी वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. यंदाच्या वर्षातील विद्यार्थ्याच्या मृत्यूची ही तिसरी घटना असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. (IIT Bombay)
(हेही वाचा – देशभरातील सर्व High Court मधील प्रलंबित खटल्यांची संख्या गेली आवाक्याबाहेर; संख्या वाचून व्हाल थक्क)
विद्यार्थ्यांचा आरोप
आंदोलक विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान दुसऱ्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेत डोकावताना पकडण्यात आले होते. त्यानंतर त्याला परीक्षा कक्षातून बाहेर काढण्यात आले तसेच निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, अशी समज देण्यात आली. या प्रकारानंतर वसतिगृहातील खोलीत परतलेल्या विद्यार्थ्याने सायंकाळी टोकाचे पाऊल उचलले. या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करत न्यायाची मागणी केली आणि संस्थेच्या संचालकांनी प्रत्यक्ष संवाद साधावा, असा आग्रह धरला. (IIT Bombay)
(हेही वाचा – Pune Railway Division : हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी १५ दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक)
प्रशासनाचे स्पष्टीकरण
दरम्यान, आयआयटी मुंबई प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात वेगळी माहिती समोर आली आहे. प्रशासनानुसार संबंधित विद्यार्थी परीक्षेदरम्यान मोबाइलचा वापर करताना आढळला होता आणि त्याने प्रश्नपत्रिका ‘चॅटजीपीटी’वर (ChatGPT) अपलोड केली होती.त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आलेली नव्हती.संबंधित शिक्षक आणि विभागप्रमुखांनी विद्यार्थ्याशी चर्चा करून त्याचे समुपदेशन केले होते तसेच शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. विद्यार्थ्याच्या निधनाबद्दल आयआयटी मुंबईने तीव्र दुःख व्यक्त केले असून त्याच्या वर्गमित्रांना व कुटुंबीयांना आवश्यक ते सहकार्य पुरवले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (IIT Bombay)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

