कल्याण-मुरबाड मार्गावर एसटी फेऱ्यांत वाढ, Pratap Sarnaik यांचा निर्णय

101
कल्याण-मुरबाड मार्गावर एसटी फेऱ्यांत वाढ, Pratap Sarnaik यांचा निर्णय
कल्याण-मुरबाड मार्गावर एसटी फेऱ्यांत वाढ, Pratap Sarnaik यांचा निर्णय

Pratap Sarnaik: कल्याण-मुरबाड मार्गावर सध्या एसटीच्या ४८ फेऱ्या चालवल्या जात असून दररोज सरासरी २ हजार २३८ प्रवासी प्रवास करत आहेत. एसटीच्या या सेवेमुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र दिवसेंदिवस या मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या पाहता या फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल पाहता एसटी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-मुरबाड मार्गावर ५ मे २०२६ पर्यंत दररोज ४८ फेऱ्या (ये-जा) चालवल्या जात होत्या. मात्र, वाढत्या प्रवासीसंख्येमुळे या फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याची तक्रार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. ज्यामध्ये अपुऱ्या एसटी सेवेमुळे अनेक प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असल्याचे म्हटले होते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी तक्रार मिळताच गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी या मार्गावरील एसटी फेऱ्या तातडीने वाढविण्याचे निर्देश दिले.

हेही वाचा – Hardik Pandya ने तिरुपतीमध्ये केसांचे दान का केले? जाणून घ्या या प्राचीन परंपरेमागील अर्थ

राज्य परिवहन महामंडळाने कल्याण-मुरबाड मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी आणि अपुऱ्या बस फेऱ्यांमुळे अतिरिक्त फेऱ्या या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या मार्गावर धावणारी एसटीच्या फेऱ्यांची संख्या १०८ वर पोहोचली आहे. प्रवाशांच्या वाढती गैरसोय आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून वारंवार मिळणाऱ्या तक्रारींमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

दररोज ६० फेऱ्या 
एसटी प्रशासनाने कल्याण-मुरबाड मार्गावर दररोज ६० अतिरिक्त एसटी फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कल्याण-मुरबाड मार्गावरून पुढे उंबर, अहिल्यानगर या भागांकडे जात असलेल्या इतर आगारांच्या एसटी बसमध्येही आता मुरबाड-सरळगाव परिसरातील प्रवाशांना प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.