Chandipura virus : गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूचा हाहाकार; २२ बालकांचा मृत्यू! जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

गुजरातमध्ये यंदाच्या पावसाळ्यात चांदीपुरा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २२ बालकांचा मृत्यू, तर ३५ रुग्णांची पुष्टी

151
Chandipura virus Gujarat
चांदीपुरा व्हायरसमुळे गुजरातमध्ये २२ बालकांचा मृत्यू

Chandipura virus Gujarat : गुजरातमध्ये यंदाच्या पावसाळ्यात चांदीपुरा (CHPV) विषाणूमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रफुल पानसेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या विषाणूमुळे २२ बालकांचा मृत्यू झाला असून १८४ संशयित नमुन्यांपैकी ३५ रुग्णांमध्ये चांदीपुरा विषाणूची पुष्टी झाली आहे. आणखी काही नमुन्यांचे अहवाल येणे बाकी असून आरोग्य विभागाने राज्यभर सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सध्या सात बालकांवर विविध सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. गांधीनगर, हिम्मतनगर (साबरकांठा), पाटण, राजकोट आणि भावनगर येथील सिव्हिल रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. दरम्यान, सहा मुलांनी उपचारानंतर पूर्णपणे बरे होऊन रुग्णालयातून घरी परतल्याची माहितीही देण्यात आली आहे. (Chandipura virus Gujarat)

संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष

राज्यात आतापर्यंत १८४ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ३५ जणांना चांदीपुरा विषाणूची लागण झाल्याचे प्रयोगशाळा चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे. ११ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित असून त्यानंतर अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो. त्यामुळे आरोग्य विभाग एकंदरच या सर्व परिस्थितीवर आणि बाधित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा: Horoscope 4 August 2026 : श्री गणेशांच्या कृपेने कसा जाईल आजचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य

चांदीपुरा विषाणू म्हणजे काय?

चांदीपुरा विषाणू (Chandipura Virus – CHPV) हा रॅब्डोव्हिरिडी (Rhabdoviridae) कुटुंबातील विषाणू आहे. हा प्रामुख्याने लहान मुलांना बाधित करतो आणि मेंदूशी संबंधित गंभीर संसर्ग (Acute Encephalitis Syndrome) निर्माण करू शकतो. या विषाणूची प्रथम नोंद महाराष्ट्रातील चांदीपुरा गावात १९६५ मध्ये झाली होती. हा विषाणू प्रामुख्याने सँड फ्लाय (वाळू माशी) आणि काही परिस्थितींमध्ये डासांद्वारे पसरत असल्याचे मानले जाते. (Chandipura virus Gujarat)

लक्षणे काय?

चांदीपुरा विषाणूची लागण झाल्यानंतर खालील लक्षणे दिसू शकतात:

  • अचानक तीव्र ताप
  • डोकेदुखी
  • उलट्या
  • अंगदुखी
  • झटके (फिट्स)
  • बेशुद्धावस्था
  • मेंदूला सूज येणे
  • गंभीर अवस्थेत कोमा किंवा मृत्यू

हा आजार अतिशय वेगाने बळावू शकतो. त्यामुळे सुरुवातीची लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.(Chandipura virus Gujarat)

हेही वाचा: Pune: खड्ड्यांची दुरुस्ती फक्त नावालाच! रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे पुणेकरांचा दररोज खोळंबा

उपचार आणि प्रतिबंध

सध्या चांदीपुरा विषाणूवर कोणतेही विशिष्ट औषध किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णाला लक्षणांनुसार उपचार (Supportive Care) दिले जातात. आरोग्य विभागाने नागरिकांना पुढील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:

  • घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे
  • डास व सँड फ्लायची पैदास रोखणे
  • मुलांना पूर्ण अंग झाकतील असे कपडे घालणे
  • मच्छरदाणी व कीटकप्रतिबंधकांचा वापर करणे
  • ताप किंवा न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करणे (Chandipura virus Gujarat)

आरोग्य विभाग सतर्क

वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये देखरेख वाढवली असून संशयित रुग्णांचा शोध, नमुन्यांची तपासणी आणि उपचार यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली बालरुग्णांवर उपचार सुरू असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. (Chandipura virus Gujarat)

हेही पाहा:

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.