Isobutanol Diesel Blend : पेट्रोलनंतर आता डिझेलचा नंबर? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नवा ‘बायोफ्युअल’ मास्टरप्लॅन काय?

93
डिझेल पंप आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची छायाचित्रे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बायोफ्युअल मास्टरप्लॅन.

भारताने हरित इंधनाकडे (Green fuel) पाऊल टाकत आपल्या जैवइंधन धोरणाचा (Biofuel Policy) पुढील टप्पा जाहीर केला आहे. या नव्या योजनेनुसार आता डिझेलमध्ये १५ टक्क्यांपर्यंत ‘आइसोब्यूटेनॉल’ (Isobutanol) हे जैवइंधन मिसळण्याचा सरकारचा विचार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी या महत्त्वाकांक्षी आराखड्याची अधिकृत माहिती दिली आहे. (Isobutanol Diesel Blend)

(हेही वाचा – संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू, Minister Kiren Rijiju यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे दिली माहिती)

इथेनॉलपासून बनणार नवे जैवइंधन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या पर्यायी इंधन धोरणावर बोलताना स्पष्ट केले की, इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिश्रित करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या मदतीने इथेनॉलचे रूपांतर आइसोब्यूटेनॉलमध्ये केले जात आहे. हे नवीन इंधन डिझेलला एक उत्तम आणि सक्षम पर्याय ठरणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेल्या चाचण्यांचे परिणाम अत्यंत सकारात्मक आले असून, शंभर टक्के इथेनॉल आणि आइसोब्यूटेनॉलवर दोन जनरेटर संच यशस्वीरीत्या चालवून दाखवण्यात आले आहेत. यावरून या इंधनावर चालणारे इंजिन बनवणे शक्य असल्याचे सिद्ध झाले आहे.

(हेही वाचा – Ali Khamenei यांच्या शवपेटीजवळील ‘ती’ छोटी शवपेटी पाहून लोकांचे डोळे पाणावले)

नवीन जैवइंधनाचे फायदे आणि तांत्रिक क्षमता
आइसोब्यूटेनॉल (Isobutanol) हे पुढील पिढीतील अतिशय प्रगत जैवइंधन मानले जाते. याची ऊर्जा घनता (Energy Density) इतर पारंपरिक जैवइंधनांपेक्षा खूप जास्त आहे, ज्यामुळे वाहनांच्या इंजिनची कार्यक्षमता उत्तम राहते. त्याच वेळी, याच्या वापरामुळे वाहनांमधून होणारे प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन अत्यंत कमी होते. देशात उत्पादित होणाऱ्या या इंधनामुळे भारतीय शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन वाचवणे सरकारला शक्य होईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.