Dombivli MIDC मध्ये पावसाचा हाहाकार; कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने उत्पादन ठप्प

89
डोंबिवली MIDC मध्ये पावसामुळे जलजळीत रस्ते
Dombivli MIDC मध्ये पावसाचा हाहाकार; कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने उत्पादन ठप्प
  • कल्याण, प्रतिनिधी

Dombivli MIDC          पावसाच्या पहिल्या दोनच दिवसांत डोंबिवली एमआयडीसीच्या दोन्ही फेजसह निवासी विभागाची अवस्था बिकट झाली आहे. निवासी आणि औद्योगिक पट्ट्यात सर्वत्र पाणीच पाणी तुंबले आहे. काही कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने उत्पादनावर थेट परिणाम होऊन उद्योजकांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. (Dombivli MIDC)

रस्ते जलमय अन् वाहतूक विस्कळीत

फेज २ मधील मालवण किनारा हॉटेल ते मेट्रोपॉलिटन एक्झोकेम कंपनी पर्यंतचा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला. त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. निवासी विभागामध्येही परिस्थिती वेगळी नाही. वंदे मातरम् उद्यान, सर्व्हिस रोड, एम्स हॉस्पीटल रस्ता आणि चार बिल्डिंग परिसर या ठिकाणी गुडघाभर पाणी साचले. (Dombivli MIDC)

(हेही वाचा – संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू, Minister Kiren Rijiju यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे दिली माहिती)

केडीएमसीसह एमआयडीसीची एकमेकांकडे टोलवाटोलवी

केडीएमसीकडून व्यवस्थित नाले सफाई न झाल्याचे या जलप्रलयाला मुख्य कारण आहे. त्यातच नवीन बांधलेले काँक्रिट रस्ते उंच झाल्याने पाणी थेट निवासी विभागातील इमारतींच्या आवारात शिरले आहे. नवीन गटारे आणि नाल्यांची कामे अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत आहेत. विको नाक्याजवळील जीएनपी गॅलरीआ कमर्शियल कॉम्प्लेक्स ते नंदी पॅलेस हॉटेल पर्यंतच्या नवीन नाल्याचे बांधकाम काही दिवसांपूर्वीच सुरू झाले होते. त्यातील खड्ड्यात पावसाचे पाणी साचून आजूबाजूला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कावेरी चौकाजवळील नाल्याचे नवीन बांधकाम देखील अर्धवट अवस्थेत आहे. (Dombivli MIDC)

जबाबदारी कुणाची?

नाले सफाईचे काम केडीएमसीकडे आहे, तर नवीन नाले आणि रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या गटारांचे बांधकाम करण्याचे काम एमआयडीसीचे आहे. मात्र दोन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहेत. प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा यावर वचक नसल्याने संपूर्ण एमआयडीसी परिसरात सावळागोंधळ निर्माण झाला आहे. (Dombivli MIDC)

(हेही वाचा – Khamenei funeral : खामेनींच्या अंत्यविधीसाठी तेहरानच्या रस्त्यावर प्रचंड गर्दी)

पुढे आणखी भयावह परिस्थिती

अजून पावसाळा बराच बाकी आहे. पहिल्याच पावसात ही अवस्था असेल तर पुढे आणखी भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे आता तरी केडीएमसी आणि एमआयडीसीने एकत्र येऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांसह उद्योजकांनी केल्याचे या भागातील जागरूक रहिवासी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे. (Dombivli MIDC)

त्रस्त उद्योजकांच्या अपेक्षा

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आम्ही शासन-प्रशासनाकडे मागण्या केल्या होत्या. पण नाले सफाई झाली नाही. आज मशीनमध्ये पाणी गेल्याने ३-४ लाखांचे नुकसान झाले. उत्पादन २ दिवस बंद आहे. याची जबाबदारी कोण घेणार? दर वर्षी हीच परिस्थिती असते. टॅक्स आम्ही भरतो आणि बुडतो पण आम्हीच. केडीएमसी आणि एमआयडीसीने एकमेकांवर खापर फोडणे बंद करून आता ठोस काम करावे, अशी अपेक्षा या भागातील उद्योजकांनी केली आहे. (Dombivli MIDC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.