Crime News: ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाली नाही, पसरवली बॉम्बची अफवा; तरुणाला पोलिसांकडून अटक

58
डायनॅमिक टाइमरसह बॉम्बचा प्रतिकात्मक फोटो
Crime News: ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाली नाही, पसरवली बॉम्बची अफवा; तरुणाला पोलिसांकडून अटक

Crime News: ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने बसायला जागा मिळाली नाही. त्यामुळे जागा मिळवण्यासाठी एका संतापलेल्या तरुणाने ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवली. तरुणाच्या बेजबाबदार वागण्यामुळे रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलीस, स्थानिक पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. ट्रेनमध्ये तात्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली.

आज तकने दिलेल्या बातमीनुसार, लखनौच्या ऐशबाग रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. तेलंगणातील एका २६ वर्षीय तरुणाला ट्रेनने प्रवास करायचा होता. मात्र ट्रेनमध्ये जागा न मिळाल्याने तो संतापला आणि त्यानंतर त्याने ट्रेनमध्ये बॉम्ब असल्याची खोटी माहिती पसरवली.

हेही वाचा  – Maharashtra Police Forceआता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होणार, मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती

सुरक्षा यंत्रणांनी प्रवाशांना खाली उतरवून संपूर्ण ट्रेनची आणि आसपासच्या परिसराची कसून तपासणी केली. तपासणीत सुरक्षा यंत्रणांना ट्रेनमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक सामग्री आढळली नाही. तपासात बॉम्बेची धमकी पूर्णपणे खोटी असल्याचे उघड झाले. त्यानंतर ट्रेन सुरक्षित घोषित करून तिला पुढील प्रवासाला परवानगी देण्यात आली.

तपासादरम्यान, पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्या तरुणाची ओळख पटवत त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तरुणाला बसायला जागा न मिळाल्याने त्याने खोटी अफवा पसरवल्याचे उघड झाले. जीआरपीने आरोपीविरुद्ध संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.