
Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेकडून ओल्या-सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी उरुळी देवाची येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेचा घनकचरा प्रकल्प उभा केला जाणार आहे. पण निविदेच्या अटी-शर्ती निश्चित करताना हे दोन्ही प्रकल्प एकच ठेकेदार (Contractor) चालवेल, अशी अट टाकली आहे. त्यामुळे या निविदेत पुरेशी स्पर्धा न होता, पुणेकरांच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला जाणार आहे. त्यामुळे ही निविदा (Tender)
पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
शहरात दररोज सुमारे २५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. शहरात कचरा जास्त आणि प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्पांची क्षमता कमी आहे. त्यामुळे कचऱ्याची समस्या गंभीर होत आहे. याचा फायदा घेत मार्च महिन्यात याबाबत स्थायी समितीपुढे पाच-दोन-दोन या नियमाखाली प्रस्ताव दाखल केला. निविदा न काढता ठराविक एका ठेकेदाराला हा प्रकल्प १५ वर्षासाठी देण्याचा घाट घातला. मात्र, हा डाव उधळून दिला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या प्रकल्पासाठी निविदा काढण्याची तयारी सुरू झाली आहे.
हेही पहा – IPL 2026 : संजू सॅमसनने सांगितली संघातून वगळल्यानंतरची भावना
घनकचरा विभागाच्या नवीन प्रस्तावानुसार, उरुळी देवाची येथे २०० टन क्षमतेचा सुक्या कचऱ्याचा आणि ३०० टन क्षमतेचा ओल्या कचऱ्याचा प्रकल्प उभा केला जाणार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी एकच निविदा काढली जाणार आहे. त्यामुळे या निविदेच्या अटी-शर्ती या ठरावीक ठेकेदारांना फायदेशीर ठरणार आहेत.
जर दोन्ही प्रकल्पांच्या निविदा स्वतंत्र काढल्यास मोठी स्पर्धा होऊन महापालिकेचे नुकसान टाळता येणार आहे. पण दोन्ही प्रकल्पासाठी एकच निविदा काढावी, यासाठी ठेकेदारांनी एका आमदाराच्या माध्यमातून दबाव आणण्यास सुरुवात केली.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे (Solid Waste Management Department) उपायुक्त प्रसाद काटकर म्हणाले की, शहरात कचरा जास्त आणि प्रक्रिया करण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे निविदा काढली आहे. ही निविदा काढताना आयुक्तांच्या सूचनेनुसार सीव्हीसी नियमावलीनुसार काढली जाईल. त्यात पुरेशी स्पर्धा होईल, यासाठी प्रयत्न केले जातील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
