NCRB Report : गुन्हेगारीचा वाढता आलेख; महिलांवरील अत्याचारात मुंबई देशात दुसरी, तर मुलांवरील गुन्ह्यांत महाराष्ट्र अव्वल!

87
NCRB report highlighting crime statistics in Maharashtra
NCRB Report : गुन्हेगारीचा वाढता आलेख; महिलांवरील अत्याचारात मुंबई देशात दुसरी, तर मुलांवरील गुन्ह्यांत महाराष्ट्र अव्वल!
  • प्रतिनिधी

NCRB Report              राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोच्या (एनसीआरबी) ‘क्रा‌इम इन इंडिया २०२४’ या ताज्या अहवालातून महाराष्ट्रातील गुन्हेगारीचे विदारक वास्तव समोर आले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या बाबतीत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा क्रमांक दिल्ली खालोखाल दुसरा लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अल्पवयीन मुलांवरील गुन्हे आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून, राज्यापुढील आव्हाने वाढली आहेत. (NCRB Report)

मुंबईत ६ हजारहून अधिक गुन्हे

एनसीआरबीच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये मुंबईत महिलांवरील गुन्ह्यांची ६,३५८ प्रकरणे नोंदवण्यात आली. २० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशातील १९ महानगरांमध्ये मुंबईचा क्रमांक दुसरा आहे. १३,३९६ प्रकरणांसह दिल्ली पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरांचा विचार करता पुण्यात २,६३१ आणि नागपुरात १,५१३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशनंतर (६६,३९८ प्रकरणे) महाराष्ट्र ४७,९५४ प्रकरणांसह दुसऱ्या स्थानी आहे. (NCRB Report)

(हेही वाचा – Modi Script: ‘मोडी लिपी संमेलन – २०२६’चे रविवारी आयोजन; परिसंवाद, प्रदर्शन, मुलाखत…भरगच्च कार्यक्रम)

मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

राज्यात चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. राज्यात मुलांवरील गुन्ह्यांशी संबंधित तब्बल २४,१७१ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर उत्तर प्रदेश २२,२२२ प्रकरणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. शहरांच्या यादीत दिल्लीनंतर मुंबईचा (३,३७४ प्रकरणे) क्रमांक लागतो. (NCRB Report)

भ्रष्टाचारातही महाराष्ट्र पुढे

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या धडक कारवायांमुळे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत महाराष्ट्रात सर्वाधिक ७२१ गुन्हे दाखल झाले आहेत. तामिळनाडू (३६४) दुसऱ्या स्थानी आहे. विशेष म्हणजे, लाच घेताना रंगेहाथ पकडण्याच्या (सापळा) कारवाईतही महाराष्ट्र (६८३ घटना) देशात आघाडीवर आहे. (NCRB Report)

(हेही वाचा – Virar Narangi Flyover: अखेर 7 वर्षांनी विरारचा नारंगी उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; रहिवाशांना दिलासा)

आर्थिक आणि सायबर गुन्हे

मुंबईत ७,७७१ आर्थिक गुन्ह्यांची नोंद झाली असून, फसवणूक आणि घोटाळ्यांच्या बाबतीत मुंबई देशातील १९ शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. सायबर गुन्ह्यांत महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे. शहरांच्या यादीत बंगळूरनंतर मुंबईचा क्रमांक लागतो. (NCRB Report)

ज्येष्ठ नागरिकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र (४,९१८ प्रकरणे) मध्य प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, पोलीस कोठडीतील मृत्यूंच्या बाबतीत गुजरातनंतर (१७ मृत्यू) महाराष्ट्रात १० प्रकरणांची नोंद झाली असून राज्य दुसऱ्या स्थानी आहे. एनसीआरबीने आपल्या अहवालात एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. “आकडेवारीतील वाढ म्हणजे केवळ पोलिसांची अकार्यक्षमता नसून, गुन्हे नोंदवण्याच्या सुलभ पद्धती, ई-एफआयआर आणि महिला हेल्पडेस्कमुळे नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत, हे देखील या वाढीमागचे एक मुख्य कारण असू शकते,” असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. (NCRB Report)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.