मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिध्द अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्या विरोधात पत्नी स्नेहा चव्हाण हिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्या प्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पती अभिनेता अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांविरोधात स्नेहा यांनी तक्रार दाखल केली आहे.
काय आहे आरोप ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्नेहा विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने लग्नाच्या तीन वर्षाच्या काळात सिनेमासृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल, या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक देणे, गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असल्याचे स्नेहाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. यात, पती अनिकेतला सासू-सासऱ्यांनी देखील साथ दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
( हेही वाचा : महापालिकेच्या चराचरांत भ्रष्टाचार )
२०१८ मध्ये झाले होते लग्न
२०१८ मध्ये काही निवडक लोकांच्या उपस्थितीत अनिकेत स्नेहाने लग्नगाठ बांधली होती. सोशल मिडीयावर त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते. अनिकेत आणि स्नेहा चव्हाण ‘हृदयात वाजे समथिंग समथिंग’ या चित्रपटात एकत्र झळकले होते. तर, स्नेहाला लाल इश्क चित्रपटामुळे विशेष प्रसिध्दी मिळाली.