-
ऋजुता लुकतुके
फिफा विश्वचषक(FIFA World Cup)२०२६ मध्ये इराणचा सहभागच आता अनिश्चित झाला आहे. त्यांनी सुरक्षेच्या कारणावरून फिफाकडे अमेरिकेतील सामने बाहेर हलवण्याची मागणी केली आहे. तर फिफानेही इराणशी चर्चेचं धोरण ठेवलं आहे. मेहदी ताज यांनी इराणची भूमिका स्पष्ट केली आहे. “जर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमच्या संघाच्या सुरक्षिततेची हमी दिली नाही, तर आम्ही अमेरिकेत प्रवास करणार नाही. आम्ही फिफासोबत चर्चा करत आहोत आणि आमचे सामने मेक्सिकोमध्ये हलवण्याची मागणी आम्ही केली आहे,” असं ताज म्हणाले.(FIFA World Cup)
या निर्णयामागील पार्श्वभूमी म्हणजे अमेरिका, इस्रायल यांनी इराणवर केलेले हवाई हल्ले. त्यामुळे मध्य-पूर्वेत संघर्ष सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर इराणने गेल्याच आठवड्यात स्पर्धेतून माघारीचा विचार व्यक्त केला होता.(FIFA World Cup)
(हेही वाचा – IPL 2026 : आयपीएलचे सामने चिन्नास्वामीवर होणार, राज्यसरकारने घातल्या ‘या’ अटी )
याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही इराणने सहभागी झालं तर चालेल पण, सुरक्षेचा विचार करता त्यांनी खेळणं योग्य नाही, असं म्हटलं होतं. इराणने यावेळी पहिल्यांदाच फिफा विश्वचषकात पात्रता मिळवली होती. २५ मार्च २०२५ला इराणचा संघ पात्रता निकष पूर्ण करणारा आशियातील पहिला संघ ठरला होता. आताच्या वेळापत्रकानुसार, त्यांना गटातील दोन सामने अमेरिकेत खेळायचे आहेत. एक सामना लॉस एंजलीसला आणि दुसरा सियाटलला होणार आहे.(FIFA World Cup)
तरीही, तणावामुळे अचानक परिस्थिती बदलली आहे. आणि आता फिफा यावर नेमका काय निर्णय घेते यावर सगळं अवलंबून आहे.(FIFA World Cup)
सध्या, आशियाई फुटबॉल फेडरेशनने त्यांना अधिकृतपणे कुठलीही माहिती मिळाल्याचं सांगितलं आहे. तर इराणने सहभागाची इच्छा बोलून दाखवली आहे. पण, अमेरिकेत न खेळण्याचा त्यांचा विचार आहे. विश्वचषकाविषयीची अनिश्चितता सध्या तरी कायम आहे.(FIFA World Cup)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

