- ऋजुता लुकतुके
T20 World Cup 2026 : आयसीसीने पुरुषांच्या टी-२० विश्वचषकानंतर विविध देशांच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना त्यांच्या मायदेशी परतण्यात होत असलेल्या विलंबाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर (International air transport) मोठा परिणाम झाला असून अनेक संघ अजूनही अडकून पडले आहेत. (T20 World Cup 2026)
आयसीसीने (ICC) दिलेल्या माहितीनुसार, या परिस्थितीत हवाई क्षेत्र बंद होणे, क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या इशाऱ्यांमुळे उड्डाणांवर निर्बंध, मार्ग बदलण्याची गरज तसेच व्यावसायिक आणि चार्टर विमानांच्या अचानक रद्द किंवा पुनर्नियोजनामुळे प्रवास व्यवस्थापन अत्यंत गुंतागुंतीचे झाले आहे. त्यामुळे संघांच्या सुरक्षित परतीसाठी अधिक वेळ लागत असल्याचेआयसीसीने स्पष्ट केले. (T20 World Cup 2026)
या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आयसीसी सतत विमान कंपन्या, चार्टर ऑपरेटर, विमानतळ प्राधिकरणे, ग्राउंड हँडलर आणि विविध देशांच्या सरकारी संस्थांशी संपर्कात असल्याचे सांगितले आहे. सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. (T20 World Cup 2026)
(हेही वाचा – India T20 Champions : टी-२० विजेतेपदानंतरही गंभीरवर माजी खेळाडू का टीका करत आहेत?)
सध्याच्या नियोजनानुसार दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाचा ताफा बुधवारी रात्रीपासून मायदेशी परतण्यास सुरुवात करणार असून पुढील ३६ तासांत सर्व सदस्य रवाना होतील. तसेच वेस्ट इंडिजमधील (West Indies) नऊ सदस्य आधीच कॅरिबियनकडे रवाना झाले असून उर्वरित १६ सदस्य पुढील २४ तासांत भारतातून उड्डाण घेणार आहेत.
आयसीसीने स्पष्ट केले की, या निर्णयांमागे फक्त सुरक्षितता, व्यवहार्यता आणि खेळाडूंचे कल्याण हेच निकष आहेत. काही माध्यमांमधून होत असलेल्या आरोपांमध्ये कोणताही तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. (T20 World Cup 2026)
संघांसोबत पत्नी आणि लहान मुलेही प्रवास करत असल्याने सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. सुरक्षित प्रवासाची खात्री झाल्याशिवाय कोणालाही हलवले जाणार नाही, अशी भूमिका आयसीसीने घेतली आहे. तसेच परिस्थिती बदलत असताना संबंधित संघांना नियमित माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (T20 World Cup 2026)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

