- ऋजुता लुकतुके
India T20 Champions : गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक (T20 World Cup) जिंकला आणि या प्रकारातील आपली ताकद जागतिक क्रिकेटमध्ये सिद्ध केली. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सलग दोन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. यामध्ये चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) आणि आता टी-२० विश्वचषकाचा समावेश आहे. (India T20 Champions)
गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी सुरुवातीपासूनच आपल्या संघतत्त्वज्ञानाबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे. वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाच्या विजयाला अधिक महत्त्व देण्यावर ते भर देतात. कोणत्याही खेळाडूच्या वैयक्तिक टप्प्यांपेक्षा संघाला जिंकण्यासाठी त्या क्षणी काय आवश्यक आहे, यावर लक्ष केंद्रित करण्याचे ते खेळाडूंना सांगतात. भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी हीच भूमिका पुन्हा स्पष्ट केली. (India T20 Champions)
(हेही वाचा – Maharashtra Unseasonal Rain: कुठे ४० अंशांचा पारा, तर कुठे अवकाळीचा इशारा)
दरम्यान, इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टिव्ह हार्मिसनने (Steve Harmison) गंभीरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ती भारतीय वरिष्ठ फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर अप्रत्यक्ष टीका असल्याचे म्हटले. टॉकस्पोर्ट क्रिकेटच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना हार्मिसन म्हणाला की, “गंभीरचे वक्तव्य मला आवडले. वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाच्या विजयावर भर देण्याचा त्यांचा संदेश हा कोहली आणि रोहित यांच्यावर सूचक टिप्पणी असल्यासारखा वाटतो.” भारतात या विधानावर टीका होत आहे. विराट, रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केलेली असताना गंभीरचं हे विधान या दोघांना आणि भारतीय संघालाही अनिश्चिततेच्या वाटेवर घेऊन जाणारं आहे, असं माजी खेळाडूंचं मत आहे. (India T20 Champions)
सध्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून ते फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत आहेत. मात्र या फॉरमॅटमध्ये दोन्ही खेळाडू अजूनही भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत कोहली दुसऱ्या आणि रोहित चौथ्या स्थानावर आहेत. त्यामुळे आगामी काळात ते पुन्हा संघात परतल्यावर ड्रेसिंग रूममधील वातावरण कसे राहते, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. (India T20 Champions)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

