भारतात अमली पदार्थांची (Drug) निर्मिती करणार्या काही कारखान्यांवर पोलिसांनी धाड घातली असून यांतील काही कारखाने विदेशातून चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. यामध्ये गंभीर सूत्र म्हणजे वर्ष २०२२ ते २०२५ या काळात महाराष्ट्रात करण्यात आलेल्या अमली पदार्थविरोधी (Drug) कारवायांमध्ये १५ पोलिसांना त्यांच्या पदावरून कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले आहे. यामध्ये पोलीस अधिकार्यांचाही समावेश आहे. वर्ष २०२५ मध्ये एका वर्षात महाराष्ट्रात १ हजार ३४० कोटी रुपयांचे अमली पदार्थ (Drug) जप्त करण्यात आले आहेत, तसेच यामध्ये ५ हजार ३०७ आरोपींना अटक करण्यात आले आहे.
(हेही वाचा US-Israel vs Iran War News : अमेरिकेसोबत चर्चा शक्य नाही; अब्बास अराघची यांची प्रत्युत्तराची भाषा)
विदेशात राहून अमली पदार्थांचे (Drug) कारखाने चालवणार्या ४ आरोपींचे प्रत्यार्पण करून त्यांना अटक करण्यात सरकारला यश आले आहे. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत होत असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करी विरोधातील कारवाईविषयी आमदार अमोल खताळ, आमदार ज्ञानेश्वर कटके यांसह अन्य आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रश्न सभागृहात चर्चेला येऊ शकला नाही; परंतु याविषयीची लेखी माहिती गृहविभागाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रात वर्ष २०२६ मध्ये एका कारवाईत २० कोटी रुपयांचे ‘मेफेड्रोन’ आणि ‘अल्प्राझोलम’ नावाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी एका पोलिसाची कामावरून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती गृहखात्याकडून लेखी उत्तरात देण्यात आली आहे. (Drug)
Join Our WhatsApp Community


