-
ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर ८ फेरीसाठी पंचांची नियुक्ती जाहीर केली आहे. भारताचा सुपर ८ फेरीतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबाद (Ahmedabad) येथे रविवारी होणार असून या महत्त्वाच्या सामन्यासाठी अनुभवी पंच रिचर्ड केटलबरो (Richard Kettleborough) आणि ख्रिस गॅफनी (Chris Gaffaney) यांची मैदानावरील पंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टीव्ही पंच म्हणून अॅलेक्स व्हॉर्फ (Alex Wharf) तर चौथे पंच म्हणून ख्रिस ब्राउन (Chris Brown) काम पाहणार आहेत. (Ind vs SA, T20 World Cup)
सुपर ८ फेरीची सुरुवात पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कोलंबो (Colombo) येथे शनिवारी झालेल्या सामन्यासाठी रॉडनी टकर आणि पॉल रायफल हे मैदानावरील पंच होते. अल्लाहुद्दीन पालेकर हे टीव्ही पंच, तर सॅम नोगास्की चौथे पंच म्हणून जबाबदारी सांभाळली. (Ind vs SA, T20 World Cup)
(हेही वाचा – जनरल नरवणेंच्या पुस्तकावर Rajnath Singh यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘निवृत्तीनंतर २० वर्षांपर्यंत…’)
२८ फेब्रुवारी रोजी कॅंडी येथे श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात टकर आणि नोगास्की पंचगिरी करतील. २४ फेब्रुवारीला त्याच ठिकाणी इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यात नोगास्की यांच्यासोबत नितीन मेनन मैदानात असतील. इंग्लंडच्या सह-यजमानांविरुद्धच्या सामन्यात अॅड्रियन होल्डस्टॉक आणि अहसान रझा यांची नियुक्ती झाली आहे.
२५ फेब्रुवारीला कोलंबो येथे श्रीलंका आणि न्यूझीलंड सामन्यात पालेकर आणि आसिफ याकूब पंच म्हणून कार्यरत असतील. १ मार्च रोजी कोलकाता येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सुपर ८ फेरीतील अखेरच्या सामन्यात गॅफनी आणि व्हॉर्फ पंचगिरी करतील. (Ind vs SA, T20 World Cup)
या फेरीत रंजन मदुगल्ले, अँड्र्यू पायकॉफ्ट, रिची रिचर्डसन आणि जवागळ श्रीनाथ हे सामनाधिकारी (मॅच रेफरी) म्हणून काम पाहणार आहेत. अनुभवी पंचांच्या नियुक्तीमुळे सुपर ८ फेरीतील सामने निष्पक्ष आणि सुरळीत पार पडतील, असा विश्वास आयसीसीने व्यक्त केला आहे. (Ind vs SA, T20 World Cup)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

