
-
मुंबई प्रतिनिधी
पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर झालेल्या टँकर अपघाताचे तीव्र पडसाद आता सार्वजनिक वाहतूक (Public transport) व्यवस्थेवर उमटले आहेत. या अपघातामुळे महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी इतकी भयंकर होती की, त्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (ST) आपल्या तब्बल १३९ फेऱ्या तडकाफडकी रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले असून नक्की किती गाड्या या चक्रव्यूहात अडकल्या होत्या, याची आकडेवारी आता समोर आली आहे. (Mumbai-Pune Expressway)
लाल परीची चाके का थांबली?
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एक्सप्रेस-वेवरील या अभूतपूर्व कोंडीमुळे राज्यातील विविध आगारांच्या १३९ बस फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. यामध्ये प्रवाशांची पहिली पसंती असलेल्या ३७ ‘ई-शिवनेरी’ बसेस आणि इतर ६६ साध्या व निमआराम बस फेऱ्यांचा समावेश आहे. (Mumbai-Pune Expressway)
(हेही वाचा – Mumbai Crime : दक्षिण मुंबईत पार्किंगच्या नावाखाली लूट; हुतात्मा चौकाजवळ दोन तोतयांना अटक)
कोणत्या जिल्ह्यांच्या गाड्या अडकल्या होत्या?
केवळ फेऱ्या रद्द झाल्या नाहीत, तर रस्त्यावर असलेल्या एकूण १६३ एसटी बसेस (ST Bus) या ट्रॅफिक जॅममध्ये तासनतास अडकून पडल्या होत्या. यात सर्वाधिक फटका सातारा विभागाला बसला असून त्यांच्या ४६ गाड्या कोंडीत होत्या. त्याखालोखाल सोलापूर विभागाच्या ३६, पुणे विभागाच्या २०, सांगलीच्या १८, कोल्हापूरच्या १३, पालघरच्या १२, ठाण्याच्या ११ आणि मुंबई विभागाच्या ७ गाड्यांचा समावेश होता.
प्रवाशांची सुरक्षितता हीच प्राथमिकता असल्याचे सांगत एसटी प्रशासनाने परिस्थिती निवळताच सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, तोपर्यंत प्रवाशांना या मनस्तापाला सामोरे जावे लागणार आहे. (Mumbai-Pune Expressway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
