-
प्रतिनिधी
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड यांच्या निधनामुळे या खटल्यात त्यांना कशाप्रकारे गोवण्यात आले, हे सिद्ध करण्याची संधी कायमची निघून गेल्याची खंत या प्रकरणातील त्यांचे अधिवक्ता आणि हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर (Virendra Ichalkaranjikar) यांनी व्यक्त केली आहे. “भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी काही पुरोगामी घटकांनी जी ‘फेक नेरेटिव्ह’ची साखळी उभी केली होती, त्यातीलच एक कडी म्हणून समीर गायकवाड यांना या प्रकरणात अटक झाली,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
खटल्याच्या ओझ्याखाली खचलेला आत्मविश्वास
अधिवक्ता इचलकरंजीकर (Virendra Ichalkaranjikar) यांनी सांगितले की, पानसरे हत्या प्रकरणात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर समीर गायकवाड यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणावर ढासळला होता. जामीन मिळण्यास झालेला विलंब, त्यानंतर सरकारकडून उच्च न्यायालयात पुन्हा धाव घेण्यात येणे आणि खटल्याची लांबणी या सगळ्याचा मानसिक ताण त्यांच्यावर होता. “‘कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी’ अशी ओळख लागल्यामुळे समीरला समाजात अपकीर्ती सहन करावी लागली. या खटल्यामुळे त्यांना काम मिळेनासे झाले. आरोपी म्हणून जी हेटाळणी झाली, ती अतिशय वेदनादायी होती,” असे इचलकरंजीकर म्हणाले.
(हेही वाचा – Siddhivinayak Mandir मध्ये माघी गणेशोत्सवाचा थाट; सोमवारपासून सोहळ्याला प्रारंभ, असा असेल धार्मिक विधींचा कार्यक्रम)
‘मी निर्दोष असूनही शिक्षा होईल का?’
इचलकरंजीकर (Virendra Ichalkaranjikar) यांनी समीर गायकवाड यांच्याशी झालेल्या संभाषणाची आठवण सांगताना नमूद केले की, शरद कळसकर आणि सचिन अंधुरे यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर समीर यांनी “त्यांना शिक्षा का झाली?” असा प्रश्न विचारला होता. “उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात ते निर्दोष ठरू शकतील, पण त्यासाठी किती वर्षे लागतील सांगता येत नाही,” असे आपण त्यांना सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “माध्यमांतील तथाकथित ‘मीडिया ट्रायल’मुळे त्याच्या चेहऱ्यावरची निराशा आजही आठवते. ‘मी निर्दोष असूनही मला शिक्षा होईल का?’ असा प्रश्न त्याने विचारला होता. तेव्हा कुठेतरी व्यवस्थेच्या खच्चीकरणाचा तो बळी ठरत असल्याची जाणीव झाली,” असे त्यांनी सांगितले.
संवेदना व्यक्त होणार का?
समीर गायकवाड यांच्या निधनानंतर समाजातून संवेदना व्यक्त होतील की नाही, याबाबतही इचलकरंजीकर (Virendra Ichalkaranjikar) यांनी खंत व्यक्त केली. त्यांनी २००८ मधील मालेगाव स्फोट प्रकरणाचा उल्लेख करत, न्यायालयात उपस्थित असलेल्या एका भक्ताचा हृदयविकाराने मृत्यू झाला, तरी त्याची दखल घेतली गेली नाही, अशी आठवण करून दिली. कोरेगाव-भीमा प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी यांच्या निधनानंतर देश-विदेशातून प्रतिक्रिया आल्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. “समीर गायकवाड यांच्या निधनावर कुणी संवेदना व्यक्त करणार का? ते मराठा होते म्हणून यावर कुणी आवाज उठवेल का?” असा प्रश्न उपस्थित करत, “एक अधिवक्ता आणि सामान्य नागरिक म्हणून ही माझी व्यथा आहे,” असे इचलकरंजीकर म्हणाले.
(हेही वाचा – घुसखोरांच्या आधारावर महापौर बसवण्याचे शिवसेना उबाठाचे स्वप्न भंगले; BJP ची बोचरी टीका)
प्रकरणाने पुन्हा उपस्थित केले प्रश्न
समीर गायकवाड यांच्या निधनानंतर पानसरे हत्या प्रकरणासह तपास यंत्रणा, न्यायप्रक्रियेचा वेग, माध्यमांची भूमिका आणि आरोपींच्या सामाजिक आयुष्यावर होणारा परिणाम याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. दोष सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष मानला जावा, या मूलभूत तत्त्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, समीर गायकवाड यांच्या मृत्यूने न्यायप्रक्रियेतील अनेक संवेदनशील पैलू पुन्हा एकदा ऐरणीवर आणले आहेत. (Virendra Ichalkaranjikar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

