Mumbai Crime : पैशांच्या वादातून तरुणाला लोटले मिठी नदीत; हत्येप्रकरणी एकाला अटक

51
Mumbai Crime
Mumbai Crime
  • प्रतिनिधी 

पाच महिन्यांपूर्वी हरवलेल्या २० वर्षाच्या तरुणांची हत्या (Mumbai Crime) करण्यात आल्याची धक्कादायक घटना कुर्ला विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याच परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पैशांच्या वादातून मिठी नदीत ढकलून हत्या केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. राहुलकुमार योगेंद्र प्रसाद (२०) असे हरवलेल्या (मृत) तरुणाचे नाव आहे. राहुलकुमार हा कुर्ला पश्चिम बैलबाजार येथील क्रांती नगर येथे कुटूंबियासह राहण्यास होता. त्याच परिसरात अंकित शाहू आरोपी राहण्यास आहे. राहुलकुमार हा एका कंपनीत कामाला होता, त्याच कंपनीत अंकित शाहू ची आई कामाला असल्यामुळे राहुल आणि अंकित यांची ओळख होती. (Mumbai Crime)

(हेही वाचा – BCB’s New Demand : बांग्लादेशने पाकिस्तानचा कित्ता गिरविला; आयसीसीला दिला विश्वचषक सामन्यांसाठी पर्याय)

२४ जुलै २०२५ रोजी राहुलकुमार हा बनियान आणि गमच्यावर घराबाहेर पडला होता, त्यानंतर तो परतला नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, परंतु तो न सापडला कुटुंबीयांनी विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याचे मिसिंग पथक राहुलचा शोध घेत होते, परंतु त्याचा काही थांग लागत नव्हता. विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट आव्हाड, पोलीस निरीक्षक दीपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी तायडे आणि पथक या मिसिंग वर काम करीत असताना तपास पथकाने राहुलकुमार यांच्या मोबाईल फोनचे लोकेशन, सीडीआर काढून तपास सुरू केला. तपास पथकाला राहुलकुमारच्या सीडीआरमध्ये अंकित शाहू याचा मोबाईल क्रमांक सापडला. २४ जुलै रोजी अंकित आणि राहुल या दोघांचे लोकेशन एकत्र दाखवत होते. पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करून संशयित अंकितला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची (Mumbai Crime) कबुली देत २४ जुलै रोजी त्याने क्रांती नगर येथे विमानतळ भीतीलगत असलेल्या मिठी नदीत राहुलकुमारला ढकलून त्याची हत्या केल्याची माहिती दिली. (Mumbai Crime)

(हेही वाचा – H1B Visa Stamping : भारतीयांनो! …तर अमेरिकेत परतणे कठीण होऊ शकते, जाणून घ्या)

राहुलकुमार याला मोबाईल फोनचे जास्त ज्ञान नसल्यामुळे त्याने अंकितला त्याच्या भविष्यनिधी निर्वाहमध्ये जमा असलेले पैसे ऑनलाइन काढण्यास सांगितले होते, राहुलने अंकितकडून भविष्य निधी निर्वाह खात्याचा पासवर्ड घेतला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंकितला तिरंगा नावाचा मोबाईल अॅप्लिकेशनवर ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागला होता. त्याने राहुलच्या खात्यावरून ३० हजार रुपये घेऊन ऑनलाईन गेमवर पैसे लावले होते. अंकितने पैसे घेतल्याचे राहुलच्या लक्षात येताच त्याने अंकितकडे पैशाची मागणी केली, पैसे दिले नाही तर त्याच्या आईकडे ऑनलाइन गेमवर पैसे लावले म्हणून सांगेल अशी धमकी दिली होती. अंकितने राहुलला संपवण्याचा कट रचून २४ जुलै रोजी त्याला मिठी नदी येथे बोलावून घेतले, आणि दोघे भिंतीवर बसून गप्पा मारत होते, दरम्यान राहुलने भीतीवर मोबाईल ठेवून भिंतीच्या पलीकडे विमान बघण्यासाठी उभा राहताच अंकितने त्याला मिठी नदीत ढकलून दिले, आणि राहुलचा फोन घेऊन तेथून निघून गेला होता अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. विनोबा भावे नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अंकितला अटक केली असून राहुलचा मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.