-
विशेष प्रतिनिधी
“उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा उबाठा गटाने मराठी माणसाच्या हितासाठी नेमकं काय केलं, हे संजय राऊतांनी (Sanjay Raut) जनतेसमोर दाखवावं. मराठी माणसासाठी आयुष्यात एक तरी ठोस काम दाखवलं, तर आम्ही त्यांना हजार रुपये देऊ,” असे थेट आव्हान भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख यांनी गुरुवारी दिले. मुंबईतील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले, “ हे मराठी माणसासाठी तुरुंगात गेले होते की पत्राचाळ घोटाळ्यामुळे? मराठी माणसांची घरे लुटली, भ्रष्टाचार केला आणि त्यामुळेच त्यांना तुरुंगात जावे लागले.” याउलट यांनी सातत्याने मराठी माणसाच्या हितासाठी काम केल्याचे त्यांनी नमूद केले. (BMC Election)
बीडीडी चाळीचा मुद्दा; उबाठा गटावर शरसंधान
ज्या बीडीडी चाळींमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी किफायतशीर दरात मराठी माणसाला घरे दिली, त्याच घरांची किंमत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारमध्ये, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) मंत्री असताना तब्बल ५० लाख रुपये ठेवण्यात आली होती, अशी आठवण करून देत नवनाथ बन यांनी आणि उबाठा गटावर टीकेची झोड उठवली. (BMC Election)
“राऊत सतत ‘देवेंद्र फडणवीस यांनी केलेली दहा कामे सांगा’ असे बालीश विधान करतात. दहाच कशाला, शंभर कामांची माहिती देऊ-मेट्रो, अटल सेतू, कोस्टल रोड, रस्ते, पायाभूत सुविधा, गृहनिर्माण आणि असंख्य विकासकामे फडणवीस यांनी केली आहेत,” असे बन म्हणाले. (BMC Election)
(हेही वाचा – अमेरिकेच्या अहवालावर China संतापला; म्हणाला, भारतासोबतचे संबंध बिघडवण्याचे कारस्थान )
हिंदुत्वावर घणाघात; काँग्रेससोबत संगनमताचा आरोप
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्वाला तिलांजली देत मुस्लिम मतांसाठी लांगुलचालन केले, देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावली आणि सत्ता पटकावली, असा आरोप नवनाथ बन यांनी केला. “याच कारणामुळे मतदारांचा कौल देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने गेला. उबाठा गट मुस्लिम मतांसाठी ‘मुस्लिम लीग’सारखा झाला आहे,” अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. (BMC Election)
‘वंदे मातरम्’वर सवाल
उबाठा–मनसे युतीचा गवगवा करणाऱ्या राऊतांवर हल्ला चढवत नवनाथ बन म्हणाले, “जागावाटप विचारताच राज ठाकरे (Raj Thackeray) यांची गाळण उडाल्याचे सर्वांनी पाहिले. खुर्चीसाठी ‘वंदे मातरम्’ला विरोध करणाऱ्यांसोबत उबाठा गट बसला आहे. हिंमत असेल तर राऊतांनी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ जाहीरपणे म्हणावे.” (BMC Election)
‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरची उपमा
उबाठा गट आणि राऊतांची अवस्था ‘पिंजरा’ चित्रपटातील मास्तरासारखी झाल्याची उपमा देत नवनाथ बन म्हणाले, “तुणतुणे घेऊन काँग्रेसच्या पायाशी बसण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. वंदनीय बाळासाहेबांचा भगवा दूर सारून हिरव्या मतांसाठी लाचारी सुरू आहे.” (BMC Election)
(हेही वाचा – KGMU Love Jihad : नामांकित वैद्यकीय विद्यापीठात लव्ह जिहादचा प्रकार; महिला डॉक्टरनेच केला भांडाफोड)
मनसेवरही निशाणा
मनसे नेते यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना नवनाथ बन म्हणाले, “ज्यांच्याकडे विचार, आचार आणि ठाम भूमिका नाही, त्यांनी इतरांवर टीका करू नये. सुपारी घेऊन, सेटलमेंटचे राजकारण करणाऱ्यांनी भाजपावर बोलू नये.”
भाजपा कधीही भाषिक–प्रांतीय वादात नाही
भाजपाने कधीही मराठी–अमराठी, भाषिक किंवा प्रांतीय वाद निर्माण केला नाही, असा ठाम दावा करत नवनाथ बन (Navnath Ban) म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की मराठी अस्मिता, मुंबई तोडण्याचा बागुलबुवा उबाठा गट आणि मनसे उभा करतात. मनसेने भाषेच्या नावावर अमराठी मुंबईकरांवर हल्ले केले. भाजपाने असा वाद कधीही निर्माण केला नाही. त्यामुळेच मुंबईकर आणि मराठी माणूस महायुतीच्या पाठीशी ठाम उभा राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाकरे बंधूंची युती ही पराभवाच्या भीतीतून झालेली युती असल्याचा आरोप करत, आगामी निवडणुकांमध्ये भाजपा–महायुतीच मुंबईत निर्णायक ठरेल, असा दावा नवनाथ बन यांनी केला. (BMC Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

