क्रीडा क्षेत्राचा राजकारणामुळे होणारा खेळखंडोबा हाणून पाडणार; Ranjit Savarkar यांनी केला निर्धार

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीविरोधात उच्च न्यायालयात तातडीने दाद मागितली जाणार असून, अशा सर्व क्रीडा संघटना राजकीय अड्डे बनवण्याचा हा सुरु असलेला प्रयत्न हाणून पाडेपर्यंत लढत राहणार, असा निर्धार रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

156
Ranjit Savarkar addressing media about sports politics
Ranjit Savarkar discusses the impact of politics on sports.

भारतातील आणि महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राचा राजकारणामुळे होणारा खेळखंडोबा हाणून पाडणार असा निर्धार व्यक्त करत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय हस्तक्षेपाचा पर्दाफाश पत्रकार परिषदमध्ये केला. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही केवळ राजकीय दबावापोटी न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून धर्मादाय आयुक्तांनी बेकायदा निवडणूक घेतल्याचा पुनरुच्चार केला.

savarkar 22

१४ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला होता की, १२ ऑक्टोबर २०२५ ला जी घटना दुरुस्ती झाली त्या घटना दुरुस्तीनुसार आणि त्या दिवशी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवडणुकीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांनुसारच निवडणुका घेण्यात याव्यात. तरीही न्यायालयाचा हा आदेश धाब्यावर बसवून धर्मादाय उपायुक्तांनी १ नोव्हेंबरला काढलेल्या आदेशात २०२२ मध्ये झालेल्या घटनादुरुस्तीनुसारच निवडणूक घेण्याचे परिपत्रक काढले. याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर ७ तारखेला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने यावर संताप व्यक्त केला आणि धर्मादाय उपायुक्तांना त्यांचा आदेश मागे घेण्यास सांगितले. त्यानुसार उपायुक्तांनी हा आदेश मागे घेण्याचे न्यायालयात मान्य देखील केले. परंतु अचानक ८ नोव्हेंबरला आम्हाला असा कुठलाही आदेश मिळालाच नसल्याचे सांगत उपायुक्तांनी निवडणूक घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार ९ नोव्हेंबरला मतदान झाले. या मतदानावर आम्ही बहिष्कार टाकला. अशा पध्दतीने लोकशाहीला काळिमा फासण्याची घटना यानिमित्ताने झाली आहे, असे रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी सांगितले.

(हेही वाचा Prisoner : कर्नाटकातील कारागृहात कैद्यांच्या रात्रभर दारू पार्ट्या; अट्टल गुन्हेगार, अतिरेक्यांना व्हीआयपी वागणूक )

ही निवडणूक नवीन क्रीडा धोरणानुसार होणे अपेक्षित होते, यानुसार झालेल्या घटनादुरुस्ती नुसारच निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतु मूळ मतदार यादीत फेरफार करुन सात जिल्ह्यांच्या संघटनांना बाहेर काढून, नवीन १३ संघटना समाविष्ट केल्या. विशेष म्हणजे प्रवीण दरेकर ज्या मुंबई उपनगर संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत, त्या संघटनेचे थकबाकीमुळे आपोआप सदस्यत्त्व रद्द झाले आहे. कारण ज्या संघटनांची थकबाकी असते त्यांना सहकार कायद्यानुसार मतदान करता येत नाही. तरीही दरेकर मुंबई उपनगर संघटनेच्या माध्यमातून निवडणुकीला उभे राहून, अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. ही गोष्टच मुळात बेकायदेशीर आहे. यामुळे ही निवडणूकच पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असा आमचा दावा आहे, असेही रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी सांगितले.

या निवडणुकीविरोधात उच्च न्यायालयात तातडीने दाद मागितली जाणार असून, अशा सर्व क्रीडा संघटना राजकीय अड्डे बनवण्याचा हा सुरु असलेला प्रयत्न हाणून पाडेपर्यंत लढत राहणार, असा निर्धार रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.