-
कल्याण, प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कल्याण मुख्यालयात सामूहिक वंदे मातरम् गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या निर्देशांनुसार, वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त शुक्रवारी केडीएमसीच्या मुख्यालयात सामूहिक वंदे मातरम् गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Kalyan)
(हेही वाचा – नेहरूंनी Vande Mataram मधून दुर्गा मातेचा उल्लेख हटवला; भाजपाने सगळेच कारनामे बाहेर काढले)
या कार्यक्रमाला आयुक्त अभिनव गोयल, माहिती व जनसंपर्क विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन वंदे मातरम् चे सामूहिक गायन करून देशभक्तीची भावना व्यक्त केली. त्यानंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत सांगितले की, वंदे मातरम् या गीतातील प्रत्येक शब्द भारत मातेविषयी असलेल्या समर्पण, ऐक्य आणि राष्ट्रीय अभिमानाची अनुभूती देतो. (Kalyan)
(हेही वाचा – ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय कर्तव्य! Ravindra Chavan यांचे प्रत्येकाला ‘प्रचारक’ बनण्याचे आवाहन)
हे गीत आपल्या संस्कृतीचे, इतिहासाचे आणि देशभक्तीच्या भावनेचे प्रतीक असल्याचे आयुक्त म्हणाले. यावेळी शिक्षण विभागाला सूचित करताना आयुक्त गोयल म्हणाले, वंदे मातरम् गीताचा इतिहास, अर्थ आणि त्यामागील संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शाळांमध्ये विशेष उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना दृढ करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांच्या जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम् च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. (Kalyan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

