बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पीक, घर आणि संसार उध्वस्त केले असताना, राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज बैलगाडीतून दौरा करीत नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. शिरूर कासार, धोंडराई, हिरापूर, ब्रह्मनाथ येळंब, मानूर आणि पाथर्डीतील विविध ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.(Beed Flood)
पंकजाताई मुंडे म्हणाल्या, “जमिनी खरडून गेल्या आहेत; शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळवणे हेच आता प्राथमिक काम आहे.” पाहणीदरम्यान त्यांनी सॅनिटरी नॅपकिनपासून पेनकिलरपर्यंत सर्व जीवनावश्यक वस्तू प्रशासनाद्वारे पाठवण्याचे आदेश दिले. धोंडराईत त्यांनी शेतकऱ्यांबरोबर बांधावरच भाजी-भाकरीचा आस्वाद घेतला आणि विस्थापित झालेल्या नागरिकांना धीर दिला.(Beed Flood)
(हेही वाचा – एकही गुंठा वंचित राहणार नाही; कृषीमंत्री Dattatray Bharne यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश)
ना. मुंडे यांनी मुंबईत कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. “जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान मोठे आहे; जास्तीत जास्त मदत मिळवून त्यांच्या पीक आणि संसाराला पुन्हा उभारी देऊ,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.(Beed Flood)
मुंडे यांचा हा दौरा केवळ फोटोग्राफीसाठी नव्हे, तर वास्तवात शेतकऱ्यांच्या दुःखाला समजून घेण्याचा आणि तातडीने मदत पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे पाहता येते. प्रत्येक भेटीत त्यांनी प्रशासनाला संकटग्रस्तांवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आणि शेतकरी व नागरिकांना धीर देत पुढील मदतीची ग्वाही दिली.
हेही पहा –


