जालना जिल्ह्यात सलग पावसामुळे शेतकरी अडचणीत, पिकांचं प्रचंड नुकसान. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट परिस्थितीचा आढावा घेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले. काही ठिकाणी सुस्तगतीबद्दल त्यांनी नाराजीही व्यक्त केली.(Dattatray Bharne )
“एकही एकर पंचनाम्याविना राहू नये. जमिनीपासून विहिरीपर्यंत सर्व नुकसान नोंदवा, अन्यथा जबाबदार तुम्हीच असाल,” असा थेट इशारा कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला.(Dattatray Bharne )
दरम्यान शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, सोयाबीनसह विविध पिकांचं झालेलं नुकसान सांगितलं. पायाभूत सुविधांवर झालेल्या परिणामाकडेही मंत्री भरणेंनी गांभीर्यानं लक्ष दिलं.
(हेही वाचा – Karnataka High Court चा एक्सला झटका; म्हणाले, भारतीय कायद्यांचं पालन करणं अनिवार्य )
राज्यातील नुकसानीचा आकडा धक्कादायक!
प्राथमिक अंदाजानुसार ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ३३.५१ लाख हेक्टर (८३.७७ लाख एकर) क्षेत्र बाधित, तर जालना जिल्ह्यात २.५५ लाख हेक्टर (६.३८ लाख एकर) शेती उध्वस्त. खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, ज्वारी, मका, भाजीपाला, फळपिके यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.(Dattatray Bharne )
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

