वडील आणि आजोबांची हत्या करून काकांना जखमी करून २३ वर्षीय तरुणाने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केल्याची घटना अंधेरी पूर्व तक्षक्षिला इमारत जवळील संतोषी माता चाळीत मंगळवारी रात्री घडली,या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवुन दिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. वडील आणि आजोबा दारूच्या नशेत आईला आणि मुलाला सतत त्रास देत होते, त्यातुन हे हत्यांकांड घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.(Mumbai Crime)
पोलिसांच्या माहितीनुसार,चेतन भात्रे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.चेतन हा अंधेरी पूर्व तक्षशिला इमारत जवळ असणाऱ्या संतोषी माता चाळ येथे बहीण,वडील मनोज भात्रे (५७) आजोबा बाबू भात्रे (७९) सोबत राहण्यास होता.चेतन याचा काका अनिल भात्रे हा त्याच चाळीत शेजारी राहण्यास होता.चेतन हा मेडिकल स्टोर्स मध्ये कामाला होता, तर बहीण एका खाजगी कंपनीत नोकरी करते.वडील मनोज हे मजुरी करायचे तर चेतनची आई ही पती आणि सासऱ्याच्या छळाला कंटाळून निघून गेली होती.वडील मनोज आणि आजोबा बाबू यांना दारूचे भयंकर व्यसन होते, नशेत असताना दोघेही कुटूंबाचा छळ करीत होते छळाला कंटाळून आरोपी चेतनची आई घर सोडून गेली होती.
(हेही वाचा – Naxalite Surrender in Dantewada : नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश; एकाच वेळी ७१ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण)
मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास चेतन कामावरून घरी परतल्यानंतर वडील मनोज भात्रे (५७), आजोबा बाबू (७९) आणि काका अनिल (५४) या तिघांसोबत वाद झाला. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वडिलांच्या वादाला कंटाळून चेतनने स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि एकामागून एक तिघांवर हल्ला चढवला. यात वडील व आजोबांचा जागीच मृत्यू झाला, तर काका गंभीर जखमी होऊन नायर रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.घटनेनंतर चेतनने रक्ताने माखलेला चाकू हातात घेऊन थेट तक्षशीला इमारतीजवळील पोलिस बीट चौकीत हजर होत आत्मसमर्पण केले. तेव्हा उपस्थित असलेले पोलिस शिपाई संजय भालेराव, विजय देवरे व सुहास नेवासे यांनी तत्परतेने त्याला शांत करत ताब्यात घेतले व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई केली.
चौकशीत चेतनने सांगितले की, वडील, आजोबा आणि काका हे तिघेही दारूचे आहारी गेलेले असून सतत भांडणे काढत. लहानपणा पासून चालत आलेल्या या छळामुळे आईने घर सोडले होते. तसेच तिघेही त्याच्याकडून आणि बहिणीकडून मिळवलेल्या पैशांचा गैरवापर करत असल्याचा त्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपी चेतन भात्रे याच्यावर भारतीय न्याय संहिते अंतर्गत खुनासह गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून तो पोलिस कोठडीत आहे.(Mumbai Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

