-
प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात मुंबई पोलिसांनी मोठ्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरातील १३,५०० पेक्षा अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि गर्दीच्या ठिकाणी ३६,००० पेक्षा जास्त पोलिस तैनात राहणार असून, ड्रोन व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने काटेकोर नजर ठेवली जाणार आहे. पोलिस आयुक्त देवेन भारती आणि सह पोलिस आयुक्त सत्य नारायण चौधरी यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या अनेकदा बैठका घेतल्या आहेत. (Ganeshotsav)
ड्रोन व सीसीटीव्हीद्वारे कडक नजर
मुंबईत बाहेरील जिल्ह्यांतूनही पोलिस दल मागवले जाण्याची शक्यता आहे. ४,००० हून अधिक वाहतूक पोलिस संयुक्त आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहतील. याशिवाय ८,४०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने संपूर्ण शहरावर लक्ष ठेवले जाईल. (Ganeshotsav)
(हेही वाचा – Rain Update : कोकणासह राज्यभर पुन्हा मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर पावसाचे सावट)
क्राउड मॅनेजमेंटसाठी ग्रीन कॉरिडॉर
एसआरपीएफ, क्यूआरटी आणि रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) सारखे विशेष पथकही तैनात केले जाणार आहेत. विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर उभारले जाणार आहेत. पोलीस विभाग परिमंडळा कडून गणेश मंडळांसोबत बैठकाही घेत आहे. (Ganeshotsav)
महिला सुरक्षेसाठी विशेष पथके
महिला सुरक्षेसाठी १,६०० हून अधिक महिला पोलिस तैनात करण्यात येतील. दंगल नियंत्रण पथक आणि होमगार्ड दलालाही विशेष जबाबदारी सोपवली जाणार आहे. विसर्जन स्थळांवर खास पोलिस बंदोबस्त उभारण्यात येईल. (Ganeshotsav)
(हेही वाचा – ‘जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला, कारण…’; केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांची पहिली प्रतिक्रिया)
लालबागच्या राजासाठी कडक सुरक्षा
लालबागच्या राजाच्या बंदोबस्तासाठी तब्बल ८,००० पेक्षा जास्त पोलिस तैनात राहतील. त्यात महिला पथक, श्वान पथक, बॉम्ब निरोधक पथक, एटीएस, गुन्हे शाखा आदी विभागांचा समावेश असेल. वाहतुकीसाठी १,२०० जवान नेमले जाणार असून, परिसरात अर्धा डझन ड्रोन नजर ठेवतील. तसेच ३ ते ४ डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्यांना विशेषतः या परिसरात तैनात केले जाईल. (Ganeshotsav)
चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्यावेशात पोलिसांची गस्त
गणेशोत्सवाच्या गर्दीत चोरीच्या घटनांवर आळा आणण्यासाठी तसेच चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्यावेशात पोलिसांची गस्त असणार आहे. तसेच हॉटेल-लॉजची तपासणी कडक तपासणी करण्यात येणार आहे. एंट्री-एग्झिट पॉइंटवर असे सीसीटीव्ही बसवले जात आहेत की, प्रत्येकाचा चेहरा स्पष्ट दिसेल. लालबाग गणेशोत्सव मंडळ आणि मुंबई पोलिसांनी भाविकांना आवाहन केले आहे की, दर्शनाला जाताना महागडे दागिने घालू नयेत आणि महागड्या मोबाईल फोनकडे विशेष लक्ष द्यावे. लहान मुलांसह येणाऱ्या कुटुंबांनीही सावधगिरी बाळगावी, कारण गर्दीत चोरट्यांना सहज संधी मिळते. (Ganeshotsav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

