Mumbai मध्ये भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपीचे उदात्तीकरण करण्याचे षडयंत्र; अभाविपचा विरोध

192

मुंबईतील (Mumbai) सेंट झेवियर्स कॉलेजने (St. Xavier’s College) वार्षिक स्टॅन स्वामी मेमोरियल लेक्चर रद्द केले आहे. हा निर्णय अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांनी स्टॅन स्वामी यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनानंतर घेण्यात आला आहे.

(हेही वाचा – गुटखा माफियांना Thane पोलिसांचा चाप; ५३ लाखांचे प्रतिबंधित पदार्थ जप्त)

माध्यमांच्या माहितीनुसार, हे लेक्चर शनिवारी (9 ऑगस्ट 2025) आयोजित होणार होते, ज्यात रोमच्या पोंटिफिकल ग्रेगोरियन विद्यापीठातील फादर प्रेम जालक्सो ‘उपजीविकेसाठी स्थलांतर: दुःखांमध्येही आशा’ या विषयावर भाषण देणार होते. मात्र, ABVP ने स्टॅन स्वामी यांच्या विरोधात कॉलेजच्या प्राचार्यांना पत्र लिहिले.

ABVP ने पत्रात फादर स्टॅन स्वामी (Father Stan Swamy) यांची आठवण काढण्यास आक्षेप घेतला. संघटनेचे म्हणणे आहे की, स्टॅन स्वामी भीमा कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणात आरोपी होते आणि त्यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्यांच्यावर बंदी घातलेल्या संघटनांशी संबंध असल्याचा आरोप होता. ते नक्षलवादी कारवायांमध्येही सहभागी होते. यामुळे त्यांना 2020 साली तुरुंगात पाठवण्यात आले होते आणि 2021 मध्ये त्यांचे निधन झाले.

ABVP ने म्हटले की, एखाद्या शैक्षणिक संस्थेने राष्ट्रविरोधी व्यक्तीचा गौरव करणे योग्य नाही. ABVP च्या या पत्रानंतर कॉलेज प्रशासनाने स्टॅन स्वामी यांच्यावर होणारा नियोजित लेक्चर कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbai)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.