-
प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी जाहीर केलेल्या राष्ट्रीय सहकार धोरणाचे सहकार क्षेत्रातून उत्स्फूर्त स्वागत होत आहे. भाजपा गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी या धोरणाचे स्वागत करताना “राष्ट्रीय सहकार धोरणाच्या माध्यमातून देशात एक नवी सहकारी क्रांती घडणार आहे,” असा विश्वास व्यक्त केला.
या धोरणाची वैशिष्ट्ये सांगताना आमदार दरेकर (Pravin Darekar) म्हणाले की, देशातील प्रत्येक जिल्ह्यात एक सहकार गाव विकसित केले जाणार आहे. दहा वर्षात सहकार क्षेत्राचा सकल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा तिपटीने वाढवला जाईल. पुढील २५ वर्षांसाठी सहकार क्षेत्राच्या वाटचालीचा कृती आराखडा तयार करण्यात आला असून, प्रत्येक गावात सहकारी संस्थांचे जाळे उभारले जाणार आहे.
(हेही वाचा – Rajasthan मध्ये शाळेची इमारत कोसळून ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू ; पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त)
महिला आणि तरुणांना केंद्रबिंदू मानून सहकारातून सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यांनी राष्ट्रीय सहकार धोरणाच्या धर्तीवर आपले राज्य सहकार धोरण तयार करणे आवश्यक आहे, असेही आमदार दरेकर (Pravin Darekar) म्हणाले. तसेच, सहकारी बँका, साखर कारखाने यांना भरीव मदत दिली जाणार असून, शहरांमध्ये टॅक्सी चालकांच्या सहकारी संस्था स्थापन करून डिसेंबरपूर्वी सेवा सुरू केली जाईल. याचा थेट लाभ टॅक्सी चालकांना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण संकल्पना मांडल्या असून, राष्ट्रीय सहकार धोरणामुळे सहकार क्षेत्रात नवी क्रांती घडेल आणि आपण सर्वजण याचे साक्षीदार आणि लाभार्थी ठरू, असेही आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

