उपराष्ट्रपतीच्या राजीनाम्यानंतर PM Narendra Modi यांची पहिली प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले?

222

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी २१ जुलैला संध्याकाळी आपल्या राजीनामा (VC President Jagdeep Dhankhar Resigns) दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात धनखड यांनी आरोग्याच्या कारणांचा उल्लेख करत आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या निर्णयाने विरोधी पक्षाने टीकेची झोड उठवली आहे. सर्व पक्षांचे नेते आणि खासदार धनखड यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देत आहेत. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (PM Narendra Modi)

(हेही वाचा – Devendra Fadnavis Birthday : वडिलांचे संस्कार, संघाचा वारसा आणि ‘रसवंतीगृह’ ते मुख्यमंत्रिपदाचा प्रवास )

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की- “श्री जगदीप धनखडजी यांना भारताचे उपराष्ट्रपतीसह अनेक भूमिकांमध्ये देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मी त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.”

(हेही वाचा – F-35B Fighter Aircraft : F-35B लढाऊ विमानाने भारताला दिला निरोप ; 5 आठवड्यांनंतर तिरुवनंतपुरम विमानतळावरून केले उड्डाण)

धनखड यांनी पत्रात काय म्हटले?
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना पाठवलेल्या राजीनाम्याबद्दल म्हटले होते- “आरोग्य सेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी संविधानाच्या कलम 67 (अ) नुसार तात्काळ प्रभावाने भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे.” धनखड हे 74 वर्षांचे आहेत आणि त्यांनी ऑगस्ट 2022 मध्ये उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. काही काळापूर्वी त्यांची दिल्ली एम्समध्ये अँजिओप्लास्टी झाली होती. याशिवाय, त्यांना या वर्षी काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जगदीप धनखड यांच्या राजकीय जीवनातील महत्त्वाचे मुद्दे
ते भाजपा, काँग्रेस आणि जनता दलाशी संबंधित आहेत.
१९८९ ते १९९१ पर्यंत राजस्थानच्या झुनझुनू लोकसभा मतदारसंघाचे खासदार.
ते १९९३ ते १९९८ पर्यंत राजस्थान विधानसभेचे सदस्य होते.
ते २०१९ ते २०२२ पर्यंत पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.
ते २०२२ ते २०२५ पर्यंत भारताचे उपराष्ट्रपती होते.

(हेही वाचा – Manikrao Kokate यांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा; मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.