IPL News : कोची टस्कर्स फ्रँचाईजीला ५३८ कोटी रुपये देण्याचे न्यायालयाचे निर्देश

कोची टस्कर्स संघ आयपीएलमधून हद्दपार झाला आहे.

59
IPL News : कोची टस्कर्स फ्रँचाईजीला ५३८ कोटी रुपये देण्याचे न्यायालयाचे निर्देश
IPL News : कोची टस्कर्स फ्रँचाईजीला ५३८ कोटी रुपये देण्याचे न्यायालयाचे निर्देश
  • ऋजुता लुकतुके

बीसीसीआयला (BCCI) एक मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कोची टस्कर्स केरळा या बंद झालेल्या आयपीएल फ्रँचाईजीला ५३८ कोटी रुपये देण्याचे निर्देश मुंबई उच्चन्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. २०११ मध्ये फक्त एकाच हंगामात हा संघ सहभागी झाला होता. त्यांनी बीसीसीआयबरोबर करार करताना अनिवार्य असलेली बँक गॅरेंटी न दिल्यामुळे नियमावर बोट ठेवून बीसीसीआयने कोची टस्कर्स केरळाबरोबरचा (Kochi Tuskers Kerala) करार रद्द केला होता. त्यानंतर या फ्रँचाईजीचं अस्तित्व नाहीसं झालं. (IPL News)

(हेही वाचा – India Tour of England : रिषभ पंतने सांगितलं चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार?)

२०१५ मध्ये या प्रकरणात प्राधिकरणाने पहिला निर्णय दिला होता. त्यांनी या प्रकरणी बीसीसीआयला (BCCI) ५५० कोटी देण्याचे निर्देश दिले होते. कोची टस्कर्स फ्रँचाईजीला ३३४ कोटी रुपये आणि उर्वरित २०० कोटी रुपये रांदेव्हू स्पोर्ट्सला द्यायचे होते. पण, बीसीसीआयने हे पैसे द्यायला नकार दिला. आणि ते निकालाविरुद्ध न्यायालयात गेले. कोची टस्कर्स ही फ्रँचाईजी एका उद्योजकांच्या समुहाने १,५५० कोटी रुपयांच्या हमीवर विकत घेतली होती. पण, त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी कराराची एक महत्त्वाची अट पाळली नाही. पुढच्या वर्षीचं वार्षिक शुल्क ही फ्रँचाईजी भरू शकली नाही. त्यामुळे बीसीसीआयने त्यांच्यावर कडक कारवाई केली. (IPL News)

(हेही वाचा – मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी हरपला ; CM Devendra Fadnavis यांनी मारूती चितमपल्लींना वाहिली श्रद्धांजली !)

या कारवाईनंतर आर्थिक देवाण घेवाणीवरून वाद सुरू झाले होते. त्यावर आता हा महत्त्वाचा निकाल आला आहे. पण, बीसीसीआय (BCCI) आणि आयपीएल प्रशासन आताही कायदेशीर बाबी तपासून हा खटला पुढे चालवण्यावर विचार करत असल्याचं समजतंय. कोची टस्कर्सचा संघ २०११ मध्ये एकच हंगाम खेळला. यात १४ सामन्यांतून ६ सामने जिंकत, १२ गुणांसह हा संघ आठव्या क्रमांकावर राहिला होता. (IPL News)

महेला जयवर्धने, रवींद्र जडेजा, ब्रँडेन मॅक्युलन आणि ब्रॅड हॉज यांच्यासारखे खेळाडू संघात होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.