उत्तर प्रदेशातील हरियावान पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Crime News) एक घटना घडली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी माहिती दिली की, एका माणसाने त्याच्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पाहिलं. राम खिलावान असं या माणसाचं नाव आहे. राम खिलवानने त्याच्या पत्नीला तिच्या बॉयफ्रेंडसह पाहिलं. ज्यानंतर तो खूप चिडला. त्याने तिथे जाऊन पत्नीला हे तू काय चालवलं आहेस म्हणत जाब विचारला. दोघांचा वाद इतका विकोपाला गेला की, शेवटी राम खिलवानने तिच्या प्रियकरासमोरच पत्नीचं नाक चावलं. (Crime News)
हेही वाचा-Flight Cancellations : दोन विमानांचे आपत्कालीन लँडिंग ! कारण आलं समोर …
या घटनेनंतर पत्नी रक्तबंबाळ झाली. २५ वर्षांची महिला जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणात पतीला अटक करण्यात आली आहे. (Crime News)
अतिरिक्त पोलीस अधीक्षक नरेंद्र कुमार यांनी माहिती दिली की, राम खिलवानला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसंच या प्रकरणाचे इतर पैलूही आम्ही तपासत आहोत असंही त्यांनी सांगितलं. राम खिलवान त्याची पत्नी आणि तिचा बॉयफ्रेंड एकाच गावातले रहिवासी आहेत. (Crime News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community