दिल्लीहून लेहला जाणारे इंडिगोचे विमान (Flight Cancellations ) 6E 2006 हे तांत्रिक बिघाडामुळे गुरुवारी सकाळी दिल्लीला परतले. विमानात क्रू मेंबर्ससह 180 लोक होते. याशिवाय, स्पाइसजेटचे विमानही उड्डाणानंतर 10 मिनिटांनी परतले. हे विमान हैदराबादहून तिरुपतीला जात होते. विमानात एकूण 80 प्रवासी होते. यापूर्वी बुधवारी एअर इंडियाचे 3 उड्डाण रद्द करण्यात आले होते. यामध्ये दिल्ली-बाली, टोरंटो-दिल्ली आणि दुबई-दिल्ली उड्डाणे यांचा समावेश होता. (Flight Cancellations )
हेही वाचा-Warkari Accident : दिंडीतील ट्रॅक्टरचं चाक बिघडलं अन् … एसटीच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू !
यापूर्वी एअर इंडियाच्या ७ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यामध्ये अहमदाबाद-लंडन, दिल्ली-पॅरिस, दिल्ली-व्हिएन्ना, लंडन-अमृतसर, दिल्ली-दुबई, बेंगळुरू-लंडन आणि सॅन फ्रान्सिस्को-मुंबई या विमानांचा समावेश होता. (Flight Cancellations )
हेही वाचा- Iran-Israel conflict: इराणमध्ये अडकलेल्या ११० भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमान परतले !
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मंगळवारी सांगितले की, एअर इंडियाने १२ ते १७ जून दरम्यान बोईंग ७८७ विमानांसह ६६ उड्डाणे रद्द केली. DCGA ने सांगितले की- १२ जूनच्या घटनेनंतर, एअर इंडियाच्या बोईंग ७८७ मालिकेतील ड्रीमलाइनरची चौकशी करण्यात आली, ज्यामध्ये सुरक्षिततेबाबत कोणतीही मोठी समस्या आढळली नाही. (Flight Cancellations )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community