उत्तर प्रदेशातील (Uttarpradesh) संभल जिल्ह्यात गेल्या वर्षी २४ नोव्हेंबर रोजी वादग्रस्त जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी समाजवादी पक्षाचे खासदार जियाउर्रहमान बर्क (Ziaur Rahman Burke), माजी मंत्री आणि संभल सदरचे आमदार नवाब इक्बाल यांच्या मुलासह २३ आरोपींविरोधात विशेष तपास पथकाने (SIT) बुधवारी एमपी-एमएलए न्यायालयात आरोपपत्र (Chargesheet) दाखल केले आहे. (Sambhal Violence)
(हेही वाचा – Raigad Rain : रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा ! नद्यांनी ओलांडली इशारा पातळी, शाळांना सुट्टी जाहीर)
खासदार आणि आमदार इक्बाल महमूद (Iqbal Mahmood) यांचा मुलगा सुहेल इक्बाल यांना गुन्हा क्रमांक ३३५/२४ मध्ये आरोपी बनवण्यात आले होते, ज्यात इतर अज्ञात आरोपींचाही समावेश होता. याच प्रकरणात जामा मशीद समितीचे अध्यक्ष जफर अली ॲडव्होकेट यांची भूमिका समोर आल्यानंतर त्यांनाही अटक करण्यात आली होती. आता एसआयटीने तथ्यांच्या आधारावर खासदार, आमदाराचा मुलगा आणि इतर २३ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
संभलचे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई (Krishna Kumar Bishnoi) यांनी सांगितले की, एसआयटीने तथ्यांच्या आधारावर तपास पूर्ण केला आहे. बुधवारी तपास अधिकाऱ्याने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या गोंधळानंतर संभल कोतवाली आणि नखासा पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात चार खुनाचे गुन्हे होते. या प्रकरणांचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला होता. एसआयटीने १० प्रकरणांमध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. ज्या प्रकरणात खासदार आणि आमदाराच्या मुलाचे नाव होते, तेच प्रकरण पोलिसांनी या संपूर्ण गोंधळाचे मुख्य प्रकरण मानले होते.
खासदारांवर अनेक आरोप
जियाउर्रहमान बर्क (Ziaur Rahman Burke) यांच्यावर भडकाऊ भाषण दिल्याचा, तर सुहेल इक्बाल यांच्यावर जमावाला भडकवल्याचा आरोप आहे. जामा मशिदीजवळ (Jama Masjid) झालेल्या गोंधळातील गुन्हा क्रमांक ३३५/२४ मध्ये दाखल एफआयआरनुसार, खासदार जियाउर्रहमान बर्क यांच्यावर गोंधळापूर्वी भडकाऊ भाषण दिल्याचा आरोप आहे. तर गोंधळाच्या दिवशी आमदार नवाब इक्बाल महमूद (Nawab Iqbal Mahmud) यांच्या मुलगा सुहेल इक्बाल यांच्यावर जमावाला भडकवल्याचा आरोप आहे. नंतर खासदारांवर आरोप लावण्यात आला की, त्यांनी गोंधळापूर्वीच सर्वेक्षण थांबवण्यासाठी आणि गर्दी जमवण्यासाठी लोकांना सांगितले होते. अशाच प्रकारचे इतर अनेक आरोप खासदारांवर लावण्यात आले आहेत. (Sambhal Violence)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community