
इराणचे (Iran-Israel conflict) सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बिनशर्त आत्मसमर्पणाच्या धमकीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खामेनी म्हणाले, ‘ज्यांना इराण, त्याचे लोक आणि त्याचा इतिहास माहीत आहे ते कधीही धमक्यांची भाषा बोलत नाहीत. इराणी लोक शरण जाणारे नाहीत. ट्रम्पनी अशा धमक्यांना घाबरणाऱ्यांनाच धमकावावे.’ (Iran-Israel conflict)
हेही वाचा-Solapur : सयाजीराजे पार्कमध्ये पाळणा तुटला ; प्रसिद्ध LIC उद्योजकाचा मृत्यू
पुढे बोलताना खामेनी म्हणाले, ‘जर अमेरिकेने इस्रायलशी युद्धात हस्तक्षेप केला तर आम्ही त्याला योग्य उत्तर देऊ. इराण भयंकर बदला घेईल. अमेरिकेला असे नुकसान होईल, जे भरून निघणार नाही.’ दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा ट्रम्प म्हणाले, ‘मी इराणच्या अणुतळांवर हल्ला करू शकतो किंवा करू शकत नाही, कुणालाही माहिती नाही.’ मंगळवारी त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते, ‘आम्हाला माहीत आहे की खामेनी कुठे लपले आहेत, परंतु आम्ही त्यांना मारणार नाही.’ (Iran-Israel conflict)
हेही वाचा- दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा आणणार; कॅबिनेट मंत्री Atul Save यांनी दिली माहिती
इराणने बुधवारी इस्रायलवर (Iran-Israel conflict) या युद्धातील सर्वात मोठा हल्ला केला. या हल्ल्यात इराणने तेल अवीवला लक्ष्य करून फताह-१ हायपरसॉनिक क्षेपणास्त्र डागले. ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट वेग असलेल्या या हायपरसॉनिक क्षेपणास्त्रामुळे तेल अवीवमधील अनेक इमारतींचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. यापूर्वी इराणने या युद्धात फक्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. इराणी हल्ल्यात आतापर्यंत इस्रायलमधील २४ लोक मृत्युमुखी आणि ६०० जण जखमी झाले. तर इराणमधील ५८५ लोक मृत्युमुखी तर १३२५ जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. (Iran-Israel conflict)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community