Sports Shoe For Men : मुलांसाठीचे स्पोर्ट्स शू किती रुपयांपासून सुरू होतात?

Sports Shoe For Men : अगदी ५०० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंत स्पोर्ट्स शू उपलब्ध आहेत. 

19
Sports Shoe For Men : मुलांसाठीचे स्पोर्ट्स शू किती रुपयांपासून सुरू होतात?
  • ऋजुता लुकतुके

रोजचं रनिंग, जिम अशा गोष्टींची आवड असलेल्या लोकांचं त्यांच्या स्पोर्ट्स शूवर अतोनात प्रेम असतं. अनेकांना रोजच्या वापरासाठीही स्पोर्ट्स शू योग्य वाटतात. भारतात स्पोर्ट्स शू वेगवेगळ्या कंपन्यांचे आणि वेगवेगळ्या दर्जाचे उपलब्ध आहेत. त्यामुळे अगदी ५०० रुपयांपासून ते १५,००० रुपयांपर्यंतचे स्पोर्ट्स शू तुम्हाला दुकानं आणि शोरुममध्ये मिळू शकतील. स्पोर्ट्स शूमध्येही टेनिस शू, फुटबॉल शू, स्निकर्स, रनिंग शू असे काही प्रकार उपलब्ध आहेत. जिमिंगसाठीही वेगळे शू मिळतात. देशी बाटा, कॅम्पस, स्पार्क्स आणि एसिक्स या कंपन्यांचे शू साधारणपणे ६०० रुपयांपासून सुरू होतात. पुढे २,०००, ३,००० अशा किमतींना ते मिळतात. (Sports Shoe For Men)

तर आदिदास, प्युमा आणि स्केचर्स, रिबॉक सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या कंपन्या प्रत्येकाच्या पायाची रचना आणि बूटाच्या मटेरियलमध्येही संशोधनपूर्ण बदल करून आधुनिक प्रकारचे शूज बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अशा शूजची किंमतही अर्थातच जास्त असते. पूर्ण पांढरे आणि पूर्ण काळ्या रंगातील शूज हे सर्वाधिक लोकप्रिय आहेत. तर अलीकडे रंगीबेरंगी शूजचीही तरुणांमध्ये चलती आहे. भारतातील सगळ्यात स्वस्त स्पोर्ट शू कॅम्पस आणि लॅन्सर कंपनीचे ५७९ रुपयांना आहेत. तर सगळ्यात महाग शूज आहेत ते मिझुनू वेव्ह्ज कंपनीचे. त्यांची किंमत आहे १७,९९९ रुपये. त्या खालोखाल नाईकी एअरमॅक्सची किंमतही १७,९९५ रुपये इतकी आहे. (Sports Shoe For Men)

भारतात अगदी कॅम्पस आणि एचआरएक्स सारख्या भारतीय बनावटीच्या ब्रँडपासून ते प्युमा, नाईकी असे काळे स्पोर्ट्स शूज उपलब्ध आहेत. ब्रँड प्रमाणे त्यांच्या किमतीही बदलतात. त्यातले फिचरही ब्रँडप्रमाणे बदलतात. सगळ्यात आधी स्पोर्ट्स शूजची एक सरासरी किंमत दर्शवणारी छोटेखानी यादी बघूया, (Sports Shoe For Men)

(हेही वाचा – स्थानिक निवडणुकांसाठी BJP चा मेगा मास्टरप्लॅन; महाविकास आघाडीला गळतीचा धोका!)

कंपनी

शू ब्रँड नाव

किंमत

कॅम्पस

मेन्स ब्लॅक मेश रनिंग

१,१२१ रु.

प्युमा

स्कॉर्च रनर व्ही२

२,२४९ रु.

कॅम्पस

ब्लॅक मेश

१,२३४

एचआरएक्स

एचआरएक्स बाय ह्रतिक

९५९ रु

रेड टेप

मेन्स वॉकिंग शूज

१,८२९ रु

कल्टस्पोर्ट

युनिसेक्स एक्सआय ट्रेनिंग

२,१४९ रु

प्युमा

हायब्रीड रनिंग

३,६७४ रु.

एसिक्स

जेल कन्टेंड ४बी

२,७९९ रु.

आदिदास

ग्लायटन रनिंग

३,४९९ रु

स्केचर्स

गो वॉक ६

२,९९९ रु.

एचआरएक्स

नॉन-मार्किंग रनिंग

१,५४७ रु.

प्युमा

सॉफ्टराईड

२,३४९ रु

रीबॉक

इफेक्ट रनर

२,७९४ रु

स्पार्क्स

रनिंग शू

८.३९ रु

स्केचर्स

गो रन ४००

२,९२४ रु

 

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.