Tukaram Maharaj Palkhi 2025 : टाळ, मृदुंगाच्या गजरात जगतगुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

59
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे. तुकोबारायांच्या देहूनगरीत सकाळपासूनच हजारो वारकरी दाखव झाले आहेत. अवघी देहूनगरी (Dehu) तुकोबांच्या नाम गजराने दुमदुमून निघाली आहे. टाळ-मृदुंगाच्या तालावर वारकरी (Waarkari) ठेका धरत वारकरी पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने निघाले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते तुकोबारायांच्या चांदीच्या पादुकांचे पूजन संपन्न झाले.  (Tukaram Maharaj Palkhi 2025)

(हेही वाचा – Pandharpur Wari : पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिस तैनात ; साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस)

देहूनगरीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी गर्दी करत आहेत. बुधवार १८ जूनपासून या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मुख्य मंदिराजवळील शिळा मंदिराच्या समोर भाविकांनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला. टाळ मृदुंगाच्या गजरात तुकोबांचे नामस्मरण केले. अभंग, ओव्या म्हणत वारकरी एक एक पाऊल पंढरीच्या दिशेने टाकत आहे. इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर तुकोबांच्या दर्शनासाठी वारकरी रांगेत उभे राहत आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच आमदार महेश लांडगे आणि आमदार सुनील शेळके देहु नगरीत उपस्थित आहेत.
यंदा २०२५ मध्ये तुकाराम महाराजांच्या पालखी सोहोळ्याचं ३४०वं वर्ष सुरू झालं आहे. महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक वारीत सहभागी झाले आहेत. सकाळपासून सुरू असलेल्या पावसात भिजत वारकरी देहूमध्ये पोहोचले आहेत. पुढील १८ दिवस हे वारकरी चालत पंढरपूरच्या दिशेने जाणार आहेत. ‘पावसाचा काही त्रास होत नाही. जेवढा पाऊस येईल तेवढा आनंद होतो,’ अशी भावना एका वारकऱ्याने व्यक्त केली.
आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्काम
देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा या ठिकाणी पालखीची पहिली आरती होईल. ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने एक- एक पाऊल टाकतील. त्यानंतर जगतगुरु तुकोबांची पालखी उद्योगनगरी पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.
(हेही वाचा – India Tour of England : जसप्रीत बुमराहने कप्तानी नाकारली की त्याला कप्तान केलं नाही?)
संत तुकाराम महाराज पायी सोहळा वेळापत्रक 2025 :-
१८ जून : प्रस्थान इनामदार वाड्यात मुक्काम
१९ जून :देहू निगडी आकुर्डी प्रवास व आकुर्डी मुक्काम
२० जून: आकुर्डी ते पुणे नाना पेठ मुक्काम
२१ जून :निवडुंगा विठ्ठल मंदिर पुणे मुक्काम
२२ जून: पुणे हडपसर लोणी काळभोर प्रवास आणि मुक्काम
२३ जून :लोणी काळभोर ते यवत प्रवास व मुक्काम
२४ जून :यवत वरवंड चौफुला प्रवास व मुक्काम
२५ जून : वरवंड ते उंडवडी गवळ्याची प्रवास व मुक्काम
२६ जून : उंडवडी गवळ्याची ते बारामती प्रवास व मुक्काम
२७ जून : बारामती काटेवाडी सणसर पालखीतळ मुक्काम ( काटेवाडी येथे मेंढी बकऱ्यांचे रिंगण )
२८ जून : संसर बेलवाडी, निमगाव केतकी प्रवास मुक्काम
(बेलवडी येथे पहिले गोल रिंगण)
२९ जून : निमगाव केतकी ते इंदापूर प्रवास व मुक्काम
(इंदापूर येथे गोल रिंगण )
३० जून : इंदापूर ते सराटी पालखीतळ प्रवास आणि मुक्काम
१ जुलै : सराटी ते अकलूज प्रवास व मुक्काम  (अकलूज येथे गोल रिंगण व सोलापूर जिल्ह्यात आगमन)
२ जुलै : अकलूज ते बोरगाव प्रवास व मुक्काम
(माळीनगर येथे उभे रिंगण )
३ जुलै : बोरगाव ते पिराची कुरोली प्रवास आणि मुक्काम
४ जुलै : पिराची कुरोली ते वाखरी पालखीतळ मुक्काम
(बाजीराव विहीर येथे उभे रिंगण )
५ जुलै : वाखरी ते पंढरपूर मुक्काम
(वाखरी येथे उभे रिंगण )
६ जुलै : एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान
१० जुलै : पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात
(हेही वाचा – अहमदाबाद विमान दुर्घटनेतील व्‍यक्‍तींच्‍या कुटुंबांसाठी HDFC Life ने क्‍लेम सबमिशन प्रक्रिया केली सोपी)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.