Beetroot Benefits : काय आहेत बिटरुट खाण्याचे फायदे? यामुळे खरोखर तुमचा स्टॅमिना वाढतो का??

26
Beetroot Benefits : काय आहेत बिटरुट खाण्याचे फायदे? यामुळे खरोखर तुमचा स्टॅमिना वाढतो का??
Beetroot Benefits : काय आहेत बिटरुट खाण्याचे फायदे? यामुळे खरोखर तुमचा स्टॅमिना वाढतो का??

बीटरूट हे एक कंदमूळ आहे. बीट हे पौष्टिक तत्त्वांनी समृद्ध असल्यामुळे त्याला सुपरफूड म्हणूनही ओळखलं जातं. कारण बीट हे अत्यंत पौष्टिक आणि आवश्यक जीवनसत्त्वं, खनिजं आणि वनस्पती संयुगांनी भरलेले असतात.

बीट हे बाल्सॅमिक रोस्टेड बीट, हमस, फ्राईज आणि सॅलड यांसारख्या पदार्थांमध्ये वापरून तुम्ही तुमच्या आहारात त्याचा समावेश करू शकता.

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला बीट खाल्ल्याने कोणते फायदे (beetroot benefits) मिळतात ते सांगणार आहोत. चला तर मग पाहुयात…

(हेही वाचा – RCB Owner : आयपीएल विजेत्या आरसीबीचे मालक कोण आहेत? या आयपीएल फ्रँचाईजीचं एकूण मूल्य किती?)

बीटमध्ये भरपूर पोषक तत्वं आणि कमी कॅलरीज असतात..

बीटमध्ये खूप जास्त पौष्टिकता असते. त्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि जीवनसत्त्वं, खनिजं ही जास्त प्रमाणात असतात. बीटमध्ये तुमच्या शरीराला गरजेची असलेली जवळजवळ सर्व जीवनसत्त्वं (Vitamins) आणि खनिजं (minerals) असतात.

उकडलेल्या बीटरूटच्या १०० ग्रॅमच्या भागामध्ये ४४ कॅलरीज, १.७ ग्रॅम प्रथिने, ०.२ ग्रॅम चरबी, १० ग्रॅम कर्बोदके, २ ग्रॅम फायबर, २०% फोलेट, १४% मॅंगनीज, ८% तांबे, ७% पोटॅशियम, ६% मॅग्नेशियम, ४% व्हिटॅमिन सी, ४% व्हिटॅमिन बी ६ आणि ४% लोह असते.

बीटमध्ये विशेषतः फोलेट हे भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे वाढ, विकास चांगला होतो. तसंच फोलेट हे हृदयाला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं.

त्यामध्ये मॅंगनीजचं प्रमाणही जास्त असतं. मँगनीज हे हाडांच्या निर्मितीमध्ये, पोषक तत्वांच्या चयापचयामध्ये, मेंदूच्या कार्यामध्ये तसंच इतर अनेक गोष्टींमध्ये महत्वाची भूमिका बजावतं. याव्यतिरिक्त बीटरूटमध्ये मोठ्या प्रमाणात असलेलं तांबे हे शरीराला ऊर्जेच्या उत्पादनासाठी खूप गरजेचं असतं.

(हेही वाचा – Donald Trump यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर !)

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते..

रिसर्चमधून असं दिसून आलं आहे की, बीटचा रस सिस्टोलिक (Systolic) आणि डायस्टोलिक (diastolic) या दोन्ही प्रकारच्या रक्तदाबाची पातळी लक्षणीयरीत्या कमी करू शकतो. रक्तदाब कमी करणारे हे परिणाम नायट्रेट्सच्या उच्च सांद्रतेमुळे होण्याची शक्यता आहे. तुमच्या शरीरामध्ये आहारातल्या नायट्रेट्सचं नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरण होतं आणि वाढलेला रक्तदाब कमी होतो.

तसंच बीटमध्ये असलेलं फोलेटचं प्रमाणही रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

रक्तदाबावर बीटचा परिणाम (beetroot benefits) हा तात्पुरता असतो. त्यामुळे जर तुम्हाला दीर्घकालीन फायदे अनुभवायचे असतील तर बीटरूट नियमितपणे सेवन करणं गरजेचं आहे.

बीटाचं सेवन केल्याने स्टॅमिना वाढतो..

अनेक रिसर्चवरून असं दिसून आलं आहे की, बीटमध्ये आढळणारे नायट्रेट्स (Nitrates) हे तुमचा स्टॅमिना वाढवू शकतात.

नायट्रेट्स तुमच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी मायटोकॉन्ड्रियाची कार्यक्षमता सुधारते आणि शारीरिक कामगिरीवर त्याचा परिणाम दिसून येतो. खासकरून खेळाडूंना याचा खूप फायदा होतो.

(हेही वाचा – Emergency च्या काळातील बंदिवानांच्या मानधनात दुप्पट वाढ)

जळजळ रोखण्यास मदत करू शकते..

बीटरूटमध्ये बीटालेन्स नावाचं रंगद्रव्य असतं. त्यांमध्ये अनेक दाहक-विरोधी गुणधर्म असतात. दीर्घकालीन दाहामुळे लठ्ठपणा, हृदयरोग, यकृत रोग आणि कर्करोग यासारखे आजार होण्याची शक्यता वाढते.

पण बिटाच्या अर्कामुळे आणि रसामुळे शरीरात विषारी द्रव्य निर्माण होण्यास प्रतिबंध होतो त्यामुळे शरीराचे दुखणे आणि जळजळ नाहीशी होते.

पचनाचं कार्य सुधारू शकते..

एक कप एवढ्या बीटरूटमध्ये ३.४ ग्रॅम एवढं फायबर असतं. फायबरमुळे पचनक्रियेला चालना मिळते व्यवस्थितपणे मलविसर्जन करण्यास मदत मिळते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होत नाही.

मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळते..

मानसिक आणि संज्ञानात्मक कार्ये ही वयानुसार नैसर्गिकरित्या कमी होतात. ज्यामुळे डिमेंशियासारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह विकारांचा धोका वाढू शकतो.

बीटरूटमधले नायट्रेट्स हे रक्तवाहिन्यांचा विस्तार वाढवतात. त्यामुळे मेंदूकडचा रक्त प्रवाह वाढतो आणि मेंदूचं कार्य सुधारतं.

विशेषतः बीटरूट हे मेंदूच्या पुढच्या भागाकडे रक्त प्रवाह वाढवतात (beetroot benefits) असं संशोधनातून दिसून आलं आहे. मेंदूचा पुढचा भाग हा निर्णय घेणे, कार्य करणे, स्मरणशक्ती यांसारख्या उच्च पातळीच्या कार्याशी संबंधित असतो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.