Iran – Israel War प्रकरणी रशियाची प्रतिक्रिया, जगाला आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले

इराणचा संपूर्ण आण्विक कार्यक्रमच नष्ट करण्याच्या उंबरठ्यावर आपण असल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. इराणमधील नेतान्झ आण्विक तळावर क्षेपणास्त्र हल्ले ( Iran - Israel War) करून इस्त्रायलने तिथे मोठा विध्वंस घडवून आणल्याचे सॅटेलाईट फोटोंवरून स्पष्ट होत आहे.

89

गेल्या आठवड्याभरापासून इस्रायल व इराण यांच्यात चालू असलेला संघर्ष आता विकोपाला गेला आहे. एकीकडे इस्रायलकडून इराणवर हवाई हल्ले ( Iran – Israel War) होत असताना इराणकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा असल्याचे जाहीर करत इराणला जाहीर इशारे द्यायला सुरूवात केली. मंगळवारी ट्रम्प यांनी थेट इराणचे सर्वोच्च नेते अली हुसेनी खोमेनी यांना ठार करण्यासंदर्भात विधान केले. यानंतर आता इराणकडूनही आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे इस्रायलकडून इराणच्या आण्विक तळांवर होणारे हल्ले हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. इस्रायलच्या हल्ल्यांनी जगाला आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे, अशी भूमिका रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने काढलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

इराणचा संपूर्ण आण्विक कार्यक्रमच नष्ट करण्याच्या उंबरठ्यावर आपण असल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. इराणमधील नेतान्झ आण्विक तळावर क्षेपणास्त्र हल्ले ( Iran – Israel War) करून इस्त्रायलने तिथे मोठा विध्वंस घडवून आणल्याचे सॅटेलाईट फोटोंवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, इराणच्या आण्विक तळांवर मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री आणि इतर साहित्य हे जमिनीत खोलवर असल्यामुळे त्यांचे नेमके किती नुकसान होऊ शकेल, याबाबत अनिश्चितता व्यक्त केली जात आहे.

(हेही वाचा Gaza-Palestine support Protest : हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे यश ! पॅलेस्टाईनच्या समर्थनातील मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली)

इस्रायलकडून इराणवर हल्ला ( Iran – Israel War) करण्यात आल्यानंतर त्यावर जर्मनीनं भूमिका मांडली आहे. “इराणला धडा शिकवण्याचे काम इस्रायल आमच्यासाठी करत आहे. आम्हीदेखील इराणच्या शासनकर्त्यांच्या अत्याचारांचे पीडित आहोत. इराणमधील या राज्यकर्त्यांनी जगभरात मृत्यू आणि विध्वंस आणला आहे, अशी प्रतिक्रिया जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मार्झ यांनी दिली आहे.

इस्रायल-इराण युद्ध जगाला भोगावं लागणार? 

इस्रायल-इराण युद्धाचा ( Iran – Israel War) परिणाम जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या उत्पादनावर होताना दिसत आहे. इस्रायल-इराण संघर्षातून या दोन्ही देशांंचे मोठे नुकसान होत असताना दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतींवर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमती तब्बल ४ टक्क्यांनी वाढल्यानंतर बुधवारी देखील त्यात वाढ झाली असून प्रतिबॅरल किमती ७५ डॉलर्सच्या वर गेल्या आहेत. इस्रायल व इराण यांच्यातील संघर्ष टोकाला गेला असताना दुसरीकडे अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेने इस्रायलला पाठिंबा दिलेला असताना आता मध्य पूर्व आशियात मोठ्या संख्येनं अमेरिकन फायटर जेट्स दाखल होऊ लागले आहेत. यात प्रामुख्याने F-16, F-22 आणि F-35 या लढाऊ विमानांचा समावेश आहे. रॉयटर्सनं यासंदर्भातलं वृत्त दिले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.