१८ जून २०२५ रोजी आझाद मैदानात डाव्या संघटनांनी ‘गाझा-पॅलेस्टाईन समर्थन’ मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्च्यावर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने (Hindu Rashtra Coordination Committee) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, तसेच मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांच्याकडे केली. या मागणीला प्रतिसाद देत मुंबई पोलिसांनी या मोर्च्याला परवानगी नाकारली आहे. (Gaza-Palestine support Protest)
(हेही वाचा – Donald Trump यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर !)
याबरोबरच पोलिसांनी फिरोज मिठीबोरवाला, मेराज सिद्दीकी, शैलेंद्र कांबळे, तबरेज आणि इतर अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि नोटीस बजावण्यात आली आहे.
या मोर्चाबाबत अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) यांनीही ट्विटरवरून माहिती दिली होती. त्याचे स्वरूप एकतर्फी, भारताच्या परराष्ट्र धोरणाविरोधात आणि इस्रायलसारख्या (Israel) मित्र राष्ट्राविरोधात आहे. हमास (Hamas) या दहशतवादी संघटनेने केलेल्या हिंसाचारावर हे आंदोलक मौन बाळगतात आणि उलट भारतातील मुस्लीम समाजाला चिथावणी देण्याचे काम करतात, असे हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे म्हणणे आहे. (Gaza-Palestine support Protest)
वर्ष २०१२ मध्ये म्यानमारमध्ये (Myanmar) मुसलमानांवर होत असल्याच्या कथित अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात आजाद मैदान, मुंबई येथे आयोजित मोर्चा दंगलात परिवर्तित झाला होता. ‘अमर जवान ज्योती’ची विटंबना, पोलीस व मीडियाच्या गाड्यांची जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेची हानी, महिला पोलीस कर्मचाऱ्यांवरील हल्ले अशा घटना घडल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा घडू शकते, अशी शक्यताही समितीने व्यक्त केली होती.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीने निवेदनात म्हटले होते की, या आंदोलनामुळे मुंबईत (Mumbai) पुन्हा धार्मिक तेढ व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हिंदूंवरील अत्याचार, काश्मिरी विस्थापन, बांगलादेशातील हिंसा (Hindus in Bangladesh) किंवा भारतावरील दहशतवादी हल्ले यावर हे आंदोलक कधीच रस्त्यावर उतरले नाहीत. हे आंदोलन मानवतावादी नसून भारतविरोधी, हिंदूविरोधी आणि अप्रत्यक्षपणे दहशतवादास समर्थन देणारे आहे. त्यामुळेच, या मोर्च्यावर बंदी घालावी आणि आयोजकांवर कठोर कारवाई करावी, ही समितीची ठाम मागणी आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेच्या आणि सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यावश्यक आहे.
हिंदूंच्या या मागणीला पोलीस आणि प्रशासन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. (Gaza-Palestine support Protest)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community