Israel Iran Conflict : आता युद्धाला सुरुवात; इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींची घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर

Israel Iran Conflict : खोमेनींना इस्रायलला ‘दहशतवादी झायोनिस्ट रेजीम’ म्हटलं तसच आता युद्धाची सुरुवात झाली आहे, असा इशारा अमेरिकेला दिला आहे.

94

इस्रायल इराणमध्ये (Israel Iran Conflict) सुरु असलेल्या युद्धाचा १८ जून हा सहावा दिवस आहे. दररोज दोन्ही देशांचे मोठे नुकसान होत आहे. अमेरिकेने इराणने या युद्धात शरणागती पत्करावी, अशी भूमिका घेतली होती. तसेच इराणचे प्रमुख अयातुल्ला खोमेनी कुठे लपले आहेत, आम्हाला माहिती आहे, अशा प्रकारचे वक्तव्यही केले होते. यानंतर इराणनेही याला प्रत्युत्तर दिले आहे.

अयातोल्लाह खोमेनी (Ayatollah Khomeini) यांनी बुधवारी सकाळी एकापाठोपाठ एक्स पोस्ट केल्या आहेत. त्यांनी इस्रायलला ‘दहशतवादी झायोनिस्ट रेजीम’ म्हटलं तसच आता युद्धाची सुरुवात झाली आहे, असा इशारा अमेरिकेला दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या धमकीला जुमानणार नसल्याचे खोमेनी यांनी एकप्रकारे संकेत दिले.

(हेही वाचा – भारत-पाकिस्तान संघर्ष Donald Trump यांच्यामुळे थांबला नाही , PM Narendra Modi यांनी स्पष्टच सांगितले …)

“दहशतवादी झायोनिस्ट रेजीमला आपण कठोर प्रत्युत्तर दिलच पाहिजे. आम्ही झायोनिस्टना दया दाखवणार नाही”

फारसी भाषेत खोमेनी यांनी ‘युद्धाची सुरुवात’ असं लिहिलय. सोबत कॅस्टले गेटमध्ये एक माणूस हातात तलवार घेऊन जातानाचा फोटो त्यांनी पोस्ट केलाय. ऐतिहासिक खैबरच्या लढाईचा हा फोटो असल्याच दावा टाइम्स ऑफ इस्रायलने केला आहे.

इस्रायलमध्ये तेल अवीव (Tel Aviv) आणि हायफा या दोन शहरात मोठ नुकसान झालं आहे. इराणमध्ये तेल प्रकल्प, सैन्य तळ, लष्करी अधिकारी यांना लक्ष्य केलं जातय. इराणचे अनेक मोठे लष्करी अधिकारी, अणूशास्त्रज्ञ मारले जात असल्याने त्यांचं रणनितीक नुकसान सुद्धा भरपूर झाले आहे. या युद्धात आतापर्यंत तटस्थ दिसत असलेल्या अमेरिकेने उतरण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल माीडियावर पोस्ट करुन इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह खोमेनी यांना सरेंडर म्हणजे शरणागती पत्करायला सांगितली आहे. पण खोमेनी (Ayatollah Khomeini) यांनी अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.