इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव आणखीन वाढत चालला आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणची राजधानी तेहरानमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. हजारो लोक भीतीपोटी शहर सोडून जात असल्याची माहिती समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोशल मीडियावर “प्रत्येकाने ताबडतोब तेहरान खाली करावे!”अशी पोस्ट केल्यामुळे तेहरान मध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. (Donald Trump)
Tehran tonight 👇
This is usually one of the busiest areas, but tonight it is empty as nearly all residents have fled the city.pic.twitter.com/9hrl9eE3Qe
— Dr. Eli David (@DrEliDavid) June 17, 2025
ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, “प्रत्येकाने ताबडतोब तेहरान खाली करावे!” त्यांनी पुढे असेही म्हटले होते की, “इराणने मी सांगितलेली ‘डील’ मान्य करायला पाहिजे होती. किती लाजिरवाणी गोष्ट आहे आणि किती मानवी नुकसान झाले आहे. मी वारंवार सांगितले आहे की, इराणला अणुबॉम्ब मिळू शकत नाहीत.” ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर तेहरानमधील अनेक लोकांनी दावा केला की, त्यांची कुटुंबे राजधानी सोडून जात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये तेहरानमधून बाहेर पडणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. हजारो लोक भीतीपोटी शहर सोडून जात असल्याचे वृत्त समोर येत आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, “माझ्या आईने सांगितले की ते सगळे तेहरान सोडत आहेत. सर्व लोक रस्त्यावर पळत आहेत. रस्त्यांवर इतकी गर्दी आहे की, गाड्या हलूही शकत नाहीत.” (Donald Trump)
The chaos continues
Long queue of vehicles in #Tehran as people leave the city after President #Trump issued warning, and asked people to evacuate. https://t.co/4QMIE3mj7w pic.twitter.com/fT8mlhkYn0
— Levina🇮🇳 (@LevinaNeythiri) June 18, 2025
दरम्यान, इस्रायलने गेल्या शुक्रवारी (१० जून) इराणवर अचानक हवाई हल्ले सुरू केले होते. या हल्ल्यांचा उद्देश इराणची अणुबॉम्ब ठिकाणे, वैज्ञानिक आणि लष्करी नेतृत्व यांना लक्ष्य करणे होता. इस्रायलचा दावा आहे की, इराणला अणुबॉम्ब मिळवण्यापासून रोखण्यासाठी ते हे पाऊल उचलत आहेत. (Donald Trump)
Mass exodus out of Tehran.
These people are going south in the direction of Saveh, but every road out of the capital looks exactly the same. pic.twitter.com/osFTprrl7n
— 𝗡𝗶𝗼𝗵 𝗕𝗲𝗿𝗴 ♛ ✡︎ (@NiohBerg) June 15, 2025
या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये आतापर्यंत किमान २४ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ५०० हून अधिक जखमी झाले आहेत, तर इराणमध्ये २२४ हून अधिक लोकांचा जीव गेला आहे. सध्या तेहरानमध्ये सुमारे १ कोटी लोक राहतात, जी इस्रायलच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली आहे की, लोक खाण्यापिण्याचे सामान घेऊन पळत आहेत आणि शहर सोडण्याची स्पर्धाच लागली आहे. (Donald Trump)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community