“Ali Khamenei कुठे लपलेत आम्हाला माहिती आहे, त्यांना आत्ताच मारणार…” ; Donald Trump यांचा गंभीर इशारा

"Ali Khamenei कुठे लपलेत आम्हाला माहिती आहे, त्यांना आत्ताच मारणार…" ; Donald Trump यांचा गंभीर इशारा

104
"Ali Khamenei कुठे लपलेत आम्हाला माहिती आहे, त्यांना आत्ताच मारणार…" ; Donald Trump यांचा गंभीर इशारा

इराण आणि इस्रायलमधील युद्धादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला आहे. इराणचे सर्वोच्च नेते खमेनी (Ali Khamenei) हे कुठे लपलेले आहेत हे आम्हाला माहिती आहे असं ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच खमेनी आमच्यासाठी सोपे टार्गेट आहे असंही म्हटलं आहे. (Ali Khamenei)

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ‘इराणचा सर्वोच्च नेता कुठे लपला आहे हे आम्हाला माहिती आहे. ते आमच्यासाठी एक सोपे टार्गेट आहे, पण तिथे ते सुरक्षित आहे. आम्ही त्यांनी तिथून बाहेर काढणार नाही. आम्ही त्यांना आत्ताच मारणार नाही. पण आम्हाला नागरिकांवर किंवा अमेरिकन सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागायची नाहीत. आमचा संयम संपत चालला आहे.’ ट्रम्प यांचे हे विधान इराणला इशारा मानले जात आहे. (Ali Khamenei)

हेही वाचा-आरएसएसचे पाचवे सरसंघचालक K. S. Sudarshan यांचा जन्मदिन; घेऊया त्यांच्या कार्याचा आढावा

परिस्थिती सुधारली नाही तर अमेरिका लष्करी कारवाई करू शकते. या युद्धादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्यामुळे इराण आणि त्यांचे सर्वोच्च नेते खमेनी यांची चिंता वाढवणार आहे. असे बोलले जात आहे की, इस्रायल आणि अमेरिकेच्या पाठिंब्याने रझा पहलवी इराणी सिंहासनावर बसण्याची शक्यता आहे. पहलवी यांनी एक पोस्ट देखील केली आहे. यामध्ये त्यांनी, “रात्री 9 वाजता इराणी राष्ट्राला एक संदेश मिळेल.” (Ali Khamenei)

हेही वाचा- Pahalgam Terror Attack नंतर काश्मीरच्या पर्यटनाला गतवैभव; अनेक पर्यटनस्थळं पर्यटकांसाठी खुली

ट्रम्प यांचा इशारा आणि रेझा पहलवी यांच्या पोस्टदरम्यान, इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली आहे. ही क्षेपणास्त्रे जॉर्डन, लेबनॉन आणि सीरियाच्या दिशेकडून डागण्यात आली आहेत. द टाईम्स ऑफ इस्रायलमधील एका वृत्तानुसार, इस्रायली हवाई दलाने इराणमध्ये आयडीएफ मोहिमेला सुरुवात झाल्यापासून 70 हवाई संरक्षण बॅटरी नष्ट केल्या आहेत. (Ali Khamenei)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.