महापालिका शाळांमध्ये ‘पालक-शिक्षक संवाद’ उपक्रम राबविणार; मंत्री Mangal Prabhat Lodha यांची घोषणा

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रवेशोत्सव; पालकसंघ राबवणार शैक्षणिक प्रश्नांवर उपाययोजना

67
महापालिका शाळांमध्ये 'पालक-शिक्षक संवाद' उपक्रम राबविणार; मंत्री Mangal Prabhat Lodha यांची घोषणा
  • प्रतिनिधी 

महापालिका शाळांतील शैक्षणिक अडचणींचा पाठपुरावा करण्यासाठी आता पालक आणि शिक्षक थेट एकत्र बसून उपाय शोधणार आहेत. पालक संघ (पेरेंट्स असोसिएशन) स्थापन करून महिन्यातून एकदा पालक-शिक्षक बैठक आयोजित करावी, अशा स्पष्ट सूचना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या. वाळकेश्वर येथील कवळे मठ महापालिका शाळेत आयोजित शाळा प्रवेशोत्सवात ते बोलत होते.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी शैक्षणिक साहित्य आणि गुलाबफूल देत विद्यार्थ्यांचे खास स्वागत केले. “शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी सणासारखा भासावा” या हेतूने आयोजित शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पालकांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या सूचना समजून घेतल्या आणि शाळा व्यवस्थापनात पालकांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला.

(हेही वाचा – Ahmedabad Plane Crash : हवाई सुंदरी मैथिली पाटीलला शेवटचा निरोप; अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार)

मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांमध्ये अजून एक महत्त्वाची भर म्हणजे – राज्याच्या थोर महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रम शाळांमध्ये दर महिन्याला आयोजित करावेत. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या विभूतिंचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी माहिती दिली की, मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या पुढाकाराने महापालिका शाळांमध्ये निवडक आयटीआय ट्रेड्सचे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या शाळा प्रवेशोत्सवाला सहायक आयुक्त मनीष वळंजू, शाळेच्या प्रशासकीय प्रमुख सायली पाटील, डी विभागातील वरिष्ठ अधिकारी, पालक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.