BMC : डि बी रियल्टीला चांदिवलीत नाकारले, मालाडमध्ये स्वीकारले; आता बांधून घेणार १३ हजार पीएपी सदनिका

836
BMC : मुंबई महानगरपालिका कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांना 'या' संकेतस्थळावर मिळणार फॉर्म-१६
  • सचिन धानजी, मुंबई 

मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) हाती घेण्यात येणाऱ्या पायाभूत विकास प्रकल्पांमधील बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी सदनिकांची (पीएपी) बांधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अंतर्गत चांदिवलीत ४ हजार प्रकल्प बाधितांच्या सदनिकांसाठी नेमलेल्या विकासकाचा प्रस्ताव रद्द करण्यात आला. परंतु या रद्द केलेल्या ठरावातील विकासकाकडूनच आता मालाडमध्ये १३००० पीएपी सदनिका बांधून घेतल्या जाणार आहे. जीएसटी वगळून सुमारे ५१ लाख रुपयांना एका सदनिकांची खरेदी केली जाणार असून ज्या विकासकावर महापालिकेने अविश्वास दाखवला होता, त्याच विकासकावर १३ हजार सदनिकांची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याने नक्की हा विश्वास महापालिकेला कुठून आला असा प्रश्न निर्माण होत आहे. यासाठी सुमारे ९०० कोटी रुपये खर्च केले जाणार असून जर याचा वापर न झाल्यास या सदनिकाही कामगारांना दिल्या जाणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांना आषाढी एकादशीच्या महापूजेचे निमंत्रण; श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी सज्ज पंढरपूर)

मुंबई महापालिकेच्यावतीने (BMC) सध्या प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी सदनिकांच्या बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला असून त्या अंतर्गत चांदिवली, भांडुप, जुहू आणि मालाड भागांत पीएपीचे बांधकाम करण्यासाठी विकासकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार चांदिवलीतील भूखंडावर ४ हजार सदनिका बांधण्यासाठी डिबी रियल्टीची नेमणूक करून डिसेंबर २०२१ मंजुरी देण्यात आली होती. परंत हा प्रकल्प झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अखत्यारितील जागेवर राबवला जाणार असल्याने यासाठी आवश्यक तो करार विकासकाने न केल्याने ऑक्टोबर २०२३मध्ये डि बी रियल्टीचा मंजूर ठराव रद्द करण्यात आला.

(हेही वाचा – Iran – Israel War मध्ये इराण जगाच्या नकाशावर पडला एकाकी; जाणून घ्या कशी आहे इराणची ‘दहशतवादी’ प्रतिमा)

त्यामुळे चांदिवलीतील ४ हजार पीएपीचा प्रकल्प रद्द करण्यात आल्यानंतर आता मालाडमध्ये १३ हजार पीएपीच्या बांधकामाची जबाबदारी याच डि बी रियल्टीकडे सोपवण्यात आली आहे. मालाडमध्ये प्रति सदनिका ५० लाख ९९ हजार रुपयांचे अधिमुल्य निश्चित करुन १३ हजार पीएपी सदनिका डि बी रियल्टीकडून बांधून घेतल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे चांदिवलीत एसआरए प्रकल्पातील सदनिका महापालिकाला (BMC) पीएपी म्हणून स्वीकारण्यास महापालिकेने नकार दिल्याने तेथील ४ हजार सदनिकांचा ठराव रद्द केला असला तर मालाड पूर्वेला या मोकळ्या जागेवर १३ हजार सदनिकांचे बांधकाम करुन दिले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. या सदनिका ३५० चौरस फुटांच्या असतील. विकासकाने प्रती सदनिका या ४४ लाख रुपयांची बोली लावून जमीन आणि बांधकाम टिडीआर धरून या सदनिकांची किंमत ५८ लाख १७ हजार रुपयांना निश्चित केली होती. परंतु नोंदणी निरिक्षक तथा राज्याचे महा नियंत्रक यांनी सन २०२५-२६ करता वार्षिक सूची दरानुसार पीएपी सदनिकांचे मुल्यांकन केल्याप्रमाणे जीएसटी वगळून ५० लाख ९८ हजार रुपये प्रती सदनिका एवढ्या किंमतीनुसार जमिन व बांधकाम हस्तांतरणीय विकास हक्क अर्थात टीडीआर व क्रेडीट नोटच्या स्वरुपात अधिमुल्याचे विकासकाला अधिदान करण्यात येणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.