
-
प्रतिनिधी
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचे औपचारिक निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना देण्यात आले. रविवार, ६ जुलै २०२५ रोजी पहाटे २.२० वाजता श्रींच्या चरणी मुख्यमंत्री फडणवीस सपत्नीक महापूजा करणार आहेत. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांचा विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे आणि चिपळ्यांनी सन्मान करण्यात आला.
(हेही वाचा – Iran-Israel War : इस्त्रायली पंतप्रधान नेत्यानाहू यांचं ठरलं; म्हणाले, ‘खोमेनींना थेट लक्ष्य केल्याने…’)
या शिष्टमंडळात मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲड. माधवी निगडे, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांचा समावेश होता. यावेळी शिष्टमंडळाने आषाढी यात्रेच्या व्यापक नियोजनाबरोबरच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जतन आणि संवर्धन कार्याची माहिती मुख्यमंत्र्यांना (CM Devendra Fadnavis) दिली.
(हेही वाचा – राज्याच्या सागरी सुरक्षेसाठी ‘हाय स्पीड गस्ती नौका’ तैनात; Nitesh Rane यांची भाऊचा धक्का येथे पाहणी)
तसेच भाविकांसाठी सुरू करण्यात आलेल्या टोकन दर्शन प्रणालीसह इतर महत्त्वाच्या सेवा-सुविधांबाबतही माहिती देण्यात आली. यंदाची आषाढी एकादशी ही रविवारच्या शुभमुहूर्तावर येत असल्याने पंढरपूर नगरीत लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होणार आहेत. शासनाच्या शासकीय पूजेची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) पार पाडणार असून, यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष विठूरायाच्या चरणांशी जोडले जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community