राज्याच्या सागरी सुरक्षेसाठी ‘हाय स्पीड गस्ती नौका’ तैनात; Nitesh Rane यांची भाऊचा धक्का येथे पाहणी

41
राज्याच्या सागरी सुरक्षेसाठी 'हाय स्पीड गस्ती नौका' तैनात; Nitesh Rane यांची भाऊचा धक्का येथे पाहणी
  • प्रतिनिधी

राज्याच्या सागरी सुरक्षेची घडी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने मोठं पाऊल उचलत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मंगळवारी भाऊचा धक्का येथे अत्याधुनिक गस्ती नौकेची पाहणी केली. या वेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सागरी सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राधान्याची बाब असून अवैध मासेमारी आणि किनारपट्टीवरील सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त गस्ती बोटी तैनात केल्या जात आहेत.

१५ हाय-स्पीड गस्ती नौकांची तैनाती; सुरुवात पाच नौकांपासून

राज्यात एकूण १५ गस्ती नौका तैनात करण्याची योजना असून त्यातील पाच नौका सध्या कार्यरत करण्यात आल्या आहेत. या नौकांमुळे ड्रोन टेहळणी प्रणालीला बळकटी मिळणार असून, मासेमारांपासून सागरी सीमांपर्यंत सर्वच स्तरांवरील सुरक्षा अधिक काटेकोर होणार आहे.

(हेही वाचा – Mumbai Police : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची सहकाऱ्यांसह काढली धिंड; नेमकं प्रकरण काय?)

‘वॉटर मेट्रो’ डिसेंबर २०२६ पर्यंत मुंबईत

मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी यावेळी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितले की, डिसेंबर २०२६ पर्यंत मुंबईत वॉटर मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. हा प्रकल्प मुंबईकरांचा वेळ आणि पैसा वाचवणारा, तसेच वाहतूक कोंडीवर तोडगा देणारा ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अत्याधुनिक बोटींच्या वैशिष्ट्यांचा उलगडा
  • १५ प्रवाशांची क्षमता, सागरी पोलिसांसाठी स्वतंत्र व्यवस्था
  • सुझुकी कंपनीची २५० एचपीची दोन इंजिन्स, वेग: ३० नॉटीकल मैल
  • रडार, ट्रान्सपॉन्डर, त्वरित प्रतिसाद प्रणालीचा समावेश
  • १३ मीटरहून अधिक लांबी, ९०० लिटर इंधन क्षमतेची फायबर बनावटीची नौका
  • द्रिष्टी, क्रूझ व फेरिस कंपनीकडून बोटींचा पुरवठा

या पाहणीवेळी मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, विभागीय अधिकारी व कर्मचारी तसेच नौका निर्मिती व पुरवठादार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सागरी सुरक्षेसाठी झपाट्याने पुढे सरसावत असलेल्या महाराष्ट्रात, या गस्ती नौकांची तैनाती आणि भविष्यातील वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे राज्याच्या सागरी हद्दीत सुरक्षिततेसह वाहतूक व्यवस्थेतही लक्षणीय बदल घडणार आहेत, हे निश्चित!

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.