India Tour of England : भारतीय संघाने ‘या’ खेळाडूला इंग्लंडमध्ये का ठेवून घेतलं?

India Tour of England : भारतीय अ संघातील इतर खेळाडू मायदेशी परतले आहेत. 

59
India Tour of England : भारतीय संघाने 'या' खेळाडूला इंग्लंडमध्ये का ठेवून घेतलं?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ आता येत्या २० तारखेपासून लीड्सला सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी सज्ज होत आहे. भारतीय संघ विरुद्ध भारतीय ए संघ असा सराव सामना आता संपला असून भारतीय संघ लीड्सला तर भारतीय ए संघ मायदेशी रवाना झाला आहे. पण, भारतीय ए संघातील एक खेळाडू संघ प्रशासनाच्या विनंती वरून राष्ट्रीय संघाबरोबर राहणार आहे. तशी परवानगी बीसीसीआयने दिली आहे. तेज गोलंदाज हर्षित राणा ही भारतात न परतता संघाबरोबर लीड्सला पोहोचला आहे. (India Tour of England)

हर्षित राणा इंग्लिश लायन्स संघाविरुद्ध खेळलेल्या दोन सामन्यांपैकी एका सामन्यात भारतीय ए संघाकडून खेळला होता. आणि रेव्ह स्पोर्ट्सने दिलेल्या बातमीनुसार, त्याला संघाबरोबर ठेवण्यात आलं आहे. अर्थात, त्याचा अधिकृतपणे संघात समावेश झालाय की, सरावासाठी तो थांबलाय हे अजून स्पष्ट झालेलं नाही. लायन्सविरुद्धच्या एका सामन्यात त्याने एक बळी मिळवला होता. आता तो संघाबरोबर राहिल्यामुळे विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. (India Tour of England)

(हेही वाचा – मिठी नदीला जोडणाऱ्या नाल्यात थर्माकोल, बॉक्स; BMC ने औद्योगिक कचरा टाकणाऱ्यांविरोधात केली पोलिस तक्रार दाखल)

कारण, संघात आधीच जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाशदीप, शार्दूल ठाकूर आणि नितिश रेड्डी असे तेज गोलंदाज आहेत. असं असताना हर्षितला इंग्लंडमध्ये का ठेवलं? बुमराह ३ चं कसोटी खेळण्याची शक्यता असल्यामुळे हर्षितला तिथे ठेवलं का, असे बरेच प्रश्न विचारले जात आहेत. बुमराह खेळणार नसलेली कसोटी पहिलीच असेल का हा आणखी एक प्रश्न आहे. (India Tour of England)

दरम्यान भारतीय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंडला परतला असून तो पुन्हा एकदा संघाची धुरा हातात घेईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ही मालिका खेळणार असून पहिली कसोटी येत्या २० तारखेपासून लीड्सला होणार आहे. (India Tour of England)

(हेही वाचा – Israel Iran Conflict : इराणचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांचा खात्मा ?; इस्रायलचा मोठा दावा)

५ कसोटींच्या या मालिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे : 

शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, नितिश कुमार रेड्डी, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग (हर्षित राणा)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.