G-7 Summit : कॅनडासोबतचे द्विपक्षीय संबंध सुधारण्याची मोठी संधी; जी-७ मधील राष्ट्रप्रमुखांना पंतप्रधान मोदी भेटणार

G-7 Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ शिखर परिषदे(G-7 Summit)त सहभागी होणार आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कॉर्नी यांनी पंतप्रधान मोदींना जी-७ शिखर परिषदे(G-7 Summit)चे निमंत्रण दिले.

43

G-7 Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-७ शिखर परिषदे(G-7 Summit)त सहभागी होणार आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कॉर्नी यांनी पंतप्रधान मोदींना जी-७ शिखर परिषदे(G-7 Summit)चे निमंत्रण दिले. पंतप्रधान मोदी कॅनडातील अल्बर्टा येथे होणाऱ्या शिखर परिषदे(G-7 Summit)नंतर सहभागी देशातील नेत्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी सलग सहाव्या वर्षी जी-७ शिखर परिषदे(G-7 Summit)त सहभागी होत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान कार्नी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.(G-7 Summit)

(हेही वाचा Israel Iran Conflict : इराणला अण्वस्त्रे बनवण्याची परवानगी नाही; ट्रम्प यांनीही दिला कठोर इशारा )

भारतासोबतच मेक्सिको व युक्रेन या देशांनाही कॅनडाकडून निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, भारत जी-७(G-7 Summit) मधील राष्ट्रांचा भाग नसतानाही भारताला मोठी संधी मिळाली आहे. दरम्यान, भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. याशिवाय, भारत जागतिक पुरवठा साखळीतही महत्त्वाची भूमिका बजावत असून शिखर परिषदेत तंत्रज्ञान, जागतिक आर्थिक स्थिरता व हवामान बदल यावर चर्चा करण्यात येऊ शकते.

(हेही वाचा Israel Iran Conflict : इस्रायलला स्वसंरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार; G7 देशांनी केले समर्थन )

जी-७(G-7 Summit) हा जगातील ७ प्रगत अर्थव्यवस्था व युरोपियन महासंघाचा एक अनौपचारिक गट आहे. त्यात अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान व युनायटेड किंग्डम यांसारख्या देशांचा समावेश आहे. रशियादेखील पूर्वी या गटाचा भाग होता, परंतु क्रिमिया देशाला आपल्यात विलीन केल्यानंतर गटातून काढून टाकण्यात आले.

 

भारताला कॅनडासोबत द्विपक्षीय संबंध सुधारण्याची संधी

कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या कार्यकाळात खलिस्तान्यांच्या मुद्द्यावरून भारतासोबतचे द्विपक्षीय संबंध ताणले गेले होते. त्यानंतर आता विद्यमान पंतप्रधान मार्क कॉर्नी यांच्या नेतृत्वातील कॅनडा भारतासोबत नव्याने द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे. तसेच, ऑक्टोबर २०२४ मध्ये खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर पाच भारतीय राजदूतांचा संबंध या प्रकरणाशी जोडण्यात आला होता. त्यांनतर भारत व कॅनडा यांच्यातील द्विपक्षीय संबंध ताणले गेले. त्यामुळे आता कॅनडातील खलिस्तान्यांच्या वादावर मार्क कॉर्नी यांची भूमिका नेमकी कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अर्ध्यातूनच माघारी

जी-७(G-7 Summit) मधील प्रमुख देश असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अर्ध्यातूनच माघारी परतले. ट्रम्प यांच्या माघारी मागील कारण इस्त्रायल-इराण यांच्यातील संघर्ष असल्याचे सांगितले जात आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्धाची परिस्थिती बिकट होत असतानाच पश्चिम आशियातील देशांमध्येही तणाव वाढताना दिसून येत आहे. यासोबतच, डोनाल्ड ट्रम्प यांच्या जी-७ शिखर परिषदे(G-7 Summit)मागील एक कारण म्हणजे टॅरिफ धोरण.(G-7 Summit)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.